बीएचआर घोटाळ्याचे धागेदोरे महाजनांपर्यंत जावून पोहचतात की काय?

0

जळगाव : जळगावातील भाईचंद हिराचंद रायसोनी क्रेडि सोसायटीतील घोटाळ्यात गुन्हा दाखल करण्यात आलेले सुनील झंवर यांच्या कार्यालयात माजी मंत्री गिरीश महाजन यांच्या लेटरपॅडसह कागदपत्रे आढळली आहेत. आर्थिक गुन्हे शाखेच्या पथकाने आज सकाळपासून जळगाव शहरातील खान्देश कॉम्प्लेक्समधील सुनील झंवर यांचे रमेश ड्रायव्हिंग स्कूलच्या कार्यालयात तपासणी सुरु केली.

याठिकाणी पोलिसांना महापालिकेचा स्वच्छतेचा मक्ता घेतलेल्या वॉटरग्रेस कंपनीची कागदपत्रे तसेच कर्मचाऱ्यांचे एटीएम कार्ड सापडल्याचे समजते. यासह माजी मंत्री गिरीश महाजन यांचे लेटर पॅड सापडल्याची जोरदार चर्चा असल्याने या प्रकरणाचे धागेदोरे महाजनांपर्यंत जावून पोहचतात की काय? अशी शक्यता निर्माण झाली आहे. याबाबत आर्थिक गुन्हे शाखेच्या अधिकारी यांनी कागदपत्रे हस्तगत केली आहेत. मात्र, ती कुणाशी संबधित आहेत, ते आताच सांगता येणार नसल्याची माहती दिली आहे.

सुनील झंवर याच्या खान्देश काम्प्लेक्समधील कार्यालयातून महापालिकेचा स्वच्छतेचा मक्ता असलेल्या वाटरग्रेस कंपनीची कागदपत्रे तसेच मक्तेदाराच्या कर्मचाऱ्यांची एटीएम कार्ड मिळाल्याची माहीती आहे. दरम्यान कागदपत्रे सापडली आहेत. मात्र, ती कुणाशी संबधित आहे याचा तपास करीत असल्याची माहिती आर्थिक गुन्हे शाखेच्या तपास अधिकाऱ्यांनी दिली आहे. दुसरीकडे गुन्ह्याती संशयित सुनिल झंवर, अवसायक जितेंद्र कंडारे यांच्यासह सहा जणांचा शोध पोलिसांकडून सुरू आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.