दिलासादायक : आज २३ नवे रूग्ण; तर ११ तालुके निरंक

0

जळगाव प्रतिनिधी : जळगाव जिल्ह्यात आज दिवसभरात २३ नवे रूग्ण आढळून आले आहे. तर आज ३५ रूग्ण बरे होऊन घरी गेले आहे.

जळगाव जिल्ह्यात दिवाळी आधी कोरोना नियंत्रणा त आला होता. मात्र त्यानंतर कोरोनाने पुन्हा डोखं वर काढलं होत. गेल्या सात आठ दिवसांपासून जिल्ह्यात बरे होणाऱ्या रुग्णांपेक्षा बाधित रूग्ण आढळून येत होते. मात्र, आज बाधित रुग्णांपेक्ष बरे होणाऱ्या रुग्णांची संख्या अधिक आहे.

जिल्ह्यात एकूण बाधितांची संख्या ५४५२५ झाली आहे. त्यात  उपचार घेऊन बरे  होऊन सुखरूप घरी गेलेले रुग्णांची संख्या ५२६७७ आहे. जिल्ह्यात सध्या ५५१ रूग्ण उपचार घेत आहे. जिल्ह्यात आज पर्यंत १२९७ रूग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे.

असे आढळले रुग्ण:-
जळगाव शहर- १४, जळगाव ग्रामीणी-२, भुसावळ-३, अमळनेर-०, चोपडा-०, पाचोरा-०, भडगाव-०, धरणगाव-०, यावल-१, एरंडोल-०, जामनेर-०, रावेर-०, पारोळा-०,चाळीसगाव-०, मुक्ताईनगर-०, बोदवड-१, इतर जिल्हे-२ असे एकूण २३  रुग्ण आढळले आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.