आर्यन खानमुळे माजी मुख्यमंत्री अडचणीत; पोलिसांकडे तक्रार

0

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क 

सध्या चर्चेत असलेले आर्यन खान प्रकरण शाहरुख खानसाठी मोठी डोकेदुखी ठरताना दिसत आहे. गेल्या काही दिवसांपासून या घटनेनं वेगळं वळण घेतलं आहे. याप्रकरणी आतापर्यत सांस्कृतिक, सामाजिक, राजकीय स्तरांतून या घटनेला वेगवेगळ्या प्रकारच्या प्रतिक्रिया मिळाल्या आहेत.

आता याप्रकरणाला  काही राजकीय नेत्यांनी या घटनेला धार्मिक रंग देण्याचा प्रयत्न केला आहे. त्यात एक नाव जम्मु काश्मीरच्या माजी मुख्यमंत्री मेहबुबा मुफ्ती यांचे आहे. त्यांनी शाहरुखला पाठींबा देत त्याच्या बाजूनं एक वक्तव्य केलं आहे. मात्र त्यांनी केलेल्या या वक्तव्याचे  तीव्र पडसाद सोशल मीडियावर उमटले आहे. त्यामुळे त्यांच्यावर टीका होताना दिसत आहे.

एनसीबीनं आर्यन खानला ड्रग्ज प्रकरणात अटक केली आहे. तो सध्या न्यायालयीन कोठडीत असून उद्या या प्रकरणावर सुनावणी होणार आहे. यासगळ्या परिस्थितीत मेहबुबा मुफ्ती यांनी एक वादग्रस्त वक्तव्य केलं आहे. त्यामुळे त्यांच्यावर टीका होताना दिसत आहे. मेहबुबा मुफ्ती यांनी सोशल मीडियावर एक प्रतिक्रिया दिली आहे. त्यात त्यांनी म्हटलं आहे की, आर्यन खानवर करण्यात आलेल्या कारवाईमागे त्याचे आडनाव हा एक महत्वाचा मुद्दा आहे. त्यांच्या या प्रकारच्या वक्तव्यामुळे त्या अडचणीत सापडल्या आहेत. याविषयी सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार मेहबुबा मुफ्ती यांच्यावर गुन्हा दाखल करावा. अशी मागणी तक्रारदार वकीलानं केली आहे. जाणीवपूर्वक एका विशिष्ट धर्माच्या लोकांना लक्ष्य केले जात आहे. एका राजकीय पक्षाची ही मतांसाठीची खेळी आहे. असेही त्यांनी म्हटलं आहे.

यावर मुफ्ती यांच्यावर दोन समुहांमध्ये वाद आणि तणाव निर्माण करण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्याची मागणी केला गेली आहे. याप्रकरणावर एका दिल्लीतील वकीलानं मुफ्ती यांच्याविरोधात तक्रार दाखल केली आहे. काही दिवसांपासून शाहरुख आणि आर्यन खान चर्चेत आले आहे. आर्यन खानला एनसीबीनं अटक केली आहे. तो सध्या न्यायालयीन कोठडीत आहे. आतापर्यत शाहरुखला बॉलीवूडमधून देखील मोठ्या प्रमाणात पाठींबा मिळाला आहे. त्याला अनेक सेलिब्रेटींनी सपोर्ट करत आर्यन खानप्रती सहानुभूती व्यक्त केली आहे.

जम्मु काश्मीरच्या माजी मुख्यमंत्री मेहबुबा मुफ्ती यांनी केलेलं वक्तव्य खेदजनक आहे. त्यामुळे दोन समुहांमध्ये तेढ निर्माण होऊ शकते. मुफ्ती यांनी एका राजकीय पक्षानं आपल्या स्वार्थासाठी अशाप्रकारे कारवाई करण्यास सुरुवात केली आहे. त्यासाठी एका विशिष्ट समुहाच्या लोकांना लक्ष्य केलं जात असल्याचे म्हटले आहे. मुफ्ती यांच्या त्या वक्तव्याची सोशल मीडियावरही जोरदार चर्चा आहे. मुफ्ती यांनी दोन समुहांमध्ये वाद आणि तणाव निर्माण करण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे. याप्रकरणी दिल्लीतील एका वकीलानं मुफ्ती यांच्याविरोधात तक्रार दाखल केली आहे.

 

Leave A Reply

Your email address will not be published.