आदित्य ठाकरेंच्या विधानसभा निवडणूक लढण्यावर शिक्कामोर्तब ; या मतदारसंघातून लढणार

0

उमेदवारी अर्ज भरण्याचा दिवसही ठरला

मुंबई: युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे विधानसभा निवडणूक लढणार यावर शिक्कामोर्तब झालं आहे. आता ते कोणत्या विधानसभा मतदारसंघातून लढणार हेही निश्चित झाल्याचं समोर आलं आहे. आदित्य ठाकरे वरळी विधानसभा मतदारसंघातून लढणार आहेत. आदित्य ठाकरेंनी मागील काही महिन्यांपासून महाराष्ट्र पिंजून काढला आहे. यातून त्यांनी विधानसभा निवडणुकीत शक्तीनिशी उडी घेतल्याचं बोललं जात आहे. विशेष म्हणजे लोकांमधून निवडणूक लढवणारे ते ठाकरे घराण्यातील पहिलेच सदस्य ठरणार आहेत.

आदित्य ठाकरे 2 किंवा 3 ऑक्टोबरला विधानसभा निवडणुकीसाठी आपला उमेदवारी अर्ज सादर करणार असल्याचं सांगितलं जात आहे. भाजप-शिवसेना युतीच्या अधिकृत घोषणेकडेच शिवसेनेचं लक्ष असल्याचंही बोललं जात आहे. युतीची घोषणा लांबल्यामुळे आदित्य यांची उमेदवारी पक्षाने अद्याप अधिकृतपणे घोषित केली नाही. युतीच्या घोषणेनंतर शिवसेना तात्काळ स्वतंत्र पत्रकार परिषद घेऊन आदित्य ठाकरेंची उमेदवारी जाहीर करण्याची शक्यता आहे. आदित्य ठाकरेंच्या उमेदवारी अर्ज भरण्याच्या निमित्ताने त्या दिवशी वरळीत शिवसेनेचं शक्तिप्रदर्शन होण्याचीही शक्यता आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.