संभाजी ब्रिगेडची विधानसभा निवडणुकीबाबत मोठी घोषणा !

0

भडगाव (प्रतिनिधी) : पाचोरा-भडगाव तालुक्यातील संभाजी ब्रिगेड पदाधिकारी व कार्यकर्त्यांची बैठक आज पार पडली. याबैठकीत विविध विषयांवर चर्चा करण्यात आली. दरम्यान, संभाजी ब्रिगेड विधानसभा निवडणूक मैदानात उतरणार असल्याचा निश्चय सर्वानुमते बैठकीत करण्यात आला.  युती- आघाडीचा अनपेक्षित निर्णय होईल  असे राजकीय चित्र असल्या मुळे संभाव्य उमेदवार संपर्कात असल्याचे संभाजी ब्रिगेड तर्फे सांगण्यात आले. ऐन वेळेस अन्य कोणी नवा चेहरा पक्षातर्फे उमेदवारी करण्याच्या शक्यते वरही चर्चा झाली.तसेच पाचोरा-भडगाव तालुक्यातून उमेदवार देण्याचा निर्णय घेण्यात आला.तसेच लवकरच पत्रकार परिषदेत पुढील वाटचाली संदर्भात घोषणा करणार असल्याचे जिल्हाध्यक्ष गणेश पाटील आणि विधानसभा क्षेत्रप्रमुख तेजस पाटील यांनी संकेत दिले.

यांची होती उपस्थिती

ज्येष्ठ पदाधिकारी विजय पाटील यांच्या अध्यक्षतेत झालेल्या बैठकीला जिल्हाध्यक्ष गणेश पाटील, विधानसभा क्षेत्रप्रमुख तेजस पाटील, सल्लागार आबा सुर्यवंशी, तालुकाध्यक्ष जीभाऊ पाटील , कुणाल पाटील (भडगाव) माजी तालुकाध्यक्ष राजेंद्र पाटील,  शहर कार्याध्यक्ष मुकेश तुपे, तालुका कार्याध्यक्ष सर्जेराव पाटील,शहराध्यक्ष रवी देवरे,संभाजी ब्रिगेड फाउंडेशनचे भूषण देशमुख, प्रवीण पाटील,जीभाऊ शिंदे, विशाल पाटील, आकाश देसले,भावडू पाटील,आप्पा महाजन, सुरेश दळवी,विजय जाधव, शिवाजी पाटील, कमलेश पाटील, ज्ञानेश्वर पाटील,सागर पाटील,मंगेश बोरसे,चेतन पाटील,सचिन पाटील,सुनील पाटील,अनंत पाटील,छत्रपती शिवाजी व मुस्लिम ब्रिगेडचे आसिफ खाटीक,टिपूसुलतान शाह,हनिफ शेख गफ्फार पटेल, नबाब खाटीक, सचिन तडवी संजय राठोड, मोतीलाल राठोड, पांडू राठोड  सह पाचोरा भडगाव तालुक्यातील पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येत उपस्थित होते.

Leave A Reply

Your email address will not be published.