कॉंग्रेसची पहिली यादी जाहीर ; खान्देशातील ”या” चार जणांचा समावेश

0

मुंबई : महाराष्ट्रात होऊ घातलेल्या आगामी विधानसभा निवडणुकीसाठी आज  कॉंग्रेस-राष्ट्रवादी आघाडीची पहिली ५१ उमेदवारांच्या नावाची यादी जाहीर करण्यात आली. कॉंग्रेसचे जनरल सेक्रेटरी मुकुल वासनिक यांनी उमेदवारांची घोषणा केली. या यादीत बहुतांश विद्यमान उमेदवारांना संधी देण्यात अली आहे. दरम्यान, या यादीमध्ये खान्देशातील ४ उमेदवारांचा समावेश आहे. रावेर विधानसभा मतदार संघातून माजी आमदार शिरीष चौधरी यांना उमेदवारी देण्यात आली आहे. तर के.सी.पाडवी (अक्कलकुवा), पद्माकर वळवी (शहादा), शिरीष सुरूपसिंग नाईक (नवापूर) या चार जणांना खान्देशातून उमेदवारी देण्यात आली आहे.

काँग्रेसने जाहीर केलेल्या पहिल्या यादीत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात, माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण, विधानसभेतील विरोधीपक्ष नेते विजय वडेट्टीवार यांच्यासह २० विद्यमान उमेदवारांना संधी देण्यात आली आहे.दरम्यान, विधानसभा निवडणुकांसाठी काँग्रेस आणि राष्ट्रवादी यांनी आघाडी केली आहे. दोन्ही पक्ष प्रत्येकी 125-125 जागा लढवणार आहेत. तर मित्रपक्षांसाठी 38 जागा सोडण्यात आल्या आहेत, असं शरद पवार यांनी सांगितलं.

Congress candidate List, काँग्रेसची पहिली यादी जाहीर, 51 उमेदवारांची घोषणा

Congress candidate List, काँग्रेसची पहिली यादी जाहीर, 51 उमेदवारांची घोषणा

Leave A Reply

Your email address will not be published.