आडगाव दगलीप्रकरण ; आरोपींचे अटकसत्र सुरूच

0

गुरुवारी २२, शुक्रवारी पुन्हा ६ आरोपींना अटक

यावल :- तालुक्यातील आडगाव येथे जुन्या वादातुन दोन गटात वाद झाल्याने दंगलीची घटना घडली होती. या दंगलीमुळे तणाव असलेले आडगाव आता हळूहळू पूर्वपदावर येत आहे. या घटनेनंतर पोलिसांना आतापर्यंत २८ संशयितांना अटक केली आहे. या अटक सत्रामुळे गावात भितीचे वातावरण दिसले. दरम्यान, याप्रकरणी अॅट्रॉसिटीच्या गुन्ह्यातील १३ आरोपींना न्यायालयीन, तर विनयभंग व जबरी लुटीच्या गुन्ह्यातील १५ आरोपींना पाच दिवसांची पोलिस कोठडी मिळाली. जिल्हा पाेलिस अधीक्षक डॉ.पंजाबराव उगले सर्व घडामोडींवर लक्ष ठेवून असून डीवायएसपी नरेंद्र पिंगळे हे यावल पोलिस ठाण्यात तळ ठोकून आहेत.

आडगाव येथे बुधवारी रात्री दोन गटात वाद झाले. याचे पर्यावसन दंगलीत झाल्याने मुख्य चौकातील दुकानांवर तुफान दगडफेक करण्यात आली. या घटनेत दोन्ही बाजूचे ९ जण जखमी झाले.याबाबत गुरुवारी दीपक सुनिल शिंदे यांच्या फिर्यादीनुसार २६ जणांविरुद्ध विनयभंग, जबरी लूट या कलमान्वये गुन्हे दाखल झाले. तर दुसऱ्या गटाकडून अमिना रमजान तडवी यांच्या फिर्यादीवरून १८ जणांविरुद्ध दंगल, अॅट्रॉसिटी व इतर कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला. दरम्यान, दीपक शिंदे यांच्या तक्रारीनुसारच्या गुन्ह्यात गुरुवारी ९ व शुक्रवारी ६ अशा १५ जणांना अटक झाली होती.

या सर्वांना शुक्रवारी ५ दिवसांची १८ जूनपर्यंत पोलिस कोठडी मिळाली. जुम्मा सिकंदर तडवी, मेहेरबान रमजान तडवी, आरिफ सुभान तडवी, मुकद्दर शरीफ तडवी, हुसेन नथु तडवी, नथू रमजान तडवी, सादिक हुसेन तडवी, हमीम जुम्मा तडवी व गुलशेर कालू तडवी (गुरुवारी अटक), सलिम हसन तडवी, इस्माईल समशेर तडवी, शकील सुभान तडवी, युनूस अकबर तडवी, संजू राजू तडवी व न्याजोद्यीन इस्माईल तडवी (शुक्रवारी अटक) अशी आरोपींची नावे आहेत. तपास एपीआय सुजित ठाकरे करत आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.