जिल्हा कारागृहातून बाहेर येत एकास जबर मारहाण

0

पोलिसासह तिघांवर गुन्हा दाखल 

जळगाव :- जिल्हा कारागृहात असलेल्या दोन आरोपींना मारहाण करीत चारचाकी वाहनात डांबून ठेवले आणि जिल्हा कारागृहाजवळ नेऊन सोडून दिल्याची घटना दि. १३ रोजी रात्री घडली. दरम्यान या प्रकरणी एका पोलीस सह तीन जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत असे की, जळगाव जिल्हा कारागृहातील दोन आरोपींनी बाहेर येत अरुण भीमराव गोसावी (४३) याला चेतन उर्फ चिंग्या सुरेश आळंदे रा.गणेशवाडी, गोलु उर्फ लखन दिलीप मराठे रा. शिवाजीनगर सह जळगाव पोलीस बाबा (नाव माहीत नाही) या तिघांनी १३ गुरुवारी रोजी रात्री मारहाण केली.

शहरातील परिसरात रिंगा अपार्टमेंट जवळ तो मित्रांसोबत उभा असतांना फोर व्हीलर (क्र.एम.एच.१९ सी.यू.८५००)वाहनातून तिथे आला. समोर असलेल्या अपारमेंट मध्ये माझे सासु सासरे राहतात. तुमची इथे उभे राहण्याची हिंमत कसी काय झाली.असे धमकावत गोसावीला फोलव्हिलर मध्ये डांबून तीघांनी बेदम मारहाण केली.फोरव्हीलर मध्ये रात्री १ वाजेला जिल्हा कारागृहाजवळ मारहाण करुन तीघांनी पोबारा केला. दि.१४ रोजी सकाळी १० वाजता एमआयडीसी पोलीस स्टेशनमध्ये येऊन रात्री घडलेला प्रकार सागितला त्यानंतर तिगांविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास पोलीस उप निरीक्षक विशाल सोनवणे करीत आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.