अनैतिक संबंधाच्या संशयावरून पत्नीसह दोन लहान मुलांची हत्या

0

ठाणे : पत्नीचे दिराशी अनैतिक संबंध असल्याच्या संशयातून पत्नीसह दोन लहान मुलांची हत्या पतीने केल्याची घटना कासारवडवली पोलीस ठाण्याच्या हद्दीत गुरुवारी सकाळी घडली. भावना अमित बागडी (२४), खुशी (६) आणि अंकुश (८) अशी हत्या झालेल्यांची नावे आहेत. या तिघांचीही लाकडी बॅटच्या सहाय्याने अमित बागडी (२९) याने निघृण हत्या केली. हत्याकांडानंतर पती फरार असून, त्याच्या शोधासाठी पाच पथके नेमण्यात आल्याची माहिती पोलीस उपायुक्त अमरसिंह जाधव यांनी दिली.

भावनाबरोबर आठ वर्षांपूर्वी लग्न झाले होते. ते मूळचे हरयाणा राज्यातील खरडालीपूर (जि. इसार) येथील रहिवासी आहेत. अमितला दारूचे व्यसन होते. त्यामुळे भावना त्याला सोडून कासारवडवली परिसरातील एका चाळीत राहणारा अमितचा सख्खा लहान भाऊ (तिचा दीर) विकास बागडी याच्यासोबत ७ वर्षांपासून मुलांसह राहत होती. अमित कधी तरी पत्नी आणि दोन्ही मुलांना भेटण्यास यायचा. तसाच तो तीन दिवसांपासून ठाण्यात आला होता. मुलांना भेटण्याच्या निमित्ताने तो भावाच्याच घरात मुले आणि पत्नीसोबत राहत होता

Leave A Reply

Your email address will not be published.