चितोडे वाणी समाजातर्फे रविवारी संवाद समाजाशी कार्यक्रमाचे आयोजन

0

 

चितोडे वाणी समाज बांधवांनी पूर्व नोंदणी करून उपस्थित राहण्याचे आवाहन

जळगाव :-चितोडे वाणी समाज जळगाव शहर आणि चिवास मराठी राष्ट्रीय कार्यकारणी यांच्यातर्फे रविवार 24 रोजी संवाद समाजाशी कार्यक्रमाचे आयोजन जळगाव शहरातील भास्कर मार्केट समोरील गोदावरी सभागृहात करण्यात आले असून यावेळी विविध सामाजिक विषयांवर चर्चा करण्यात येणार आहे. या कार्यक्रमाला समाज बांधवांनी उपस्थित राहावे यासाठी पूर्व नोंदणी करण्यात येत असून ही नोंदणी समाज प्रतिनिधीला करता येईल असे आवाहन आयोजकांतर्फे करण्यात आले आहे. दरम्यान हा कार्यक्रम चितोडे वाणी समाज बांधवांसाठी मर्यादित असल्याचे आयोजकांकर तर्फे कळविण्यात आले आहे.

 

यावेळी विविध सामाजिक विषयांवर चर्चा करण्यात येणार आहे. समाजाची वैचारिक प्रगल्भता वाढविण्यासाठी आणि सर्व दृष्टीने सामाजिक कार्यातील उंची वाढविण्याचा दृष्टीने एक दिवसीय कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

या महत्वपूर्ण बैठकीस गावोगावच्या ५५ प्रतिनिधींनी पूर्व नोंदणी केली आहे. बैठकीस उपस्थित राहण्यासाठी समाज प्रतिनिधी आज देखील नोंदणी करू शकतात किंवा वेळेवर देखील येऊ शकतात.

*चितोडे वाणी समाज जळगाव शहर* आणि *चिवास मराठी राष्ट्रीय कार्यकारिणी* तर्फे ह्या ऐतीहासिक कार्यक्रमाचे आयोजन होत आहे.

सर्व गावांमधील चितोडे वाणी समाजाचे विविध संस्थांचे अध्यक्ष,उपाध्यक्ष,सचिव, कोषाध्यक्ष व पदाधिकारी , राष्ट्रीय कार्यकारणी चे सदस्य आणि आपल्या चितोडे वाणी समाजाच्या सामाजिक कार्यात सर्वांनी सहभागी  होऊन
स्वयंफुर्तीने तरुण ~ तरुणीने संवाद समाजाशी कार्यक्रमात सहभागी व्हावे असे आवाहन करण्यात आले आहे.
या लिंक वर करा नाव नोंदणी

https://forms.gle/bXEX9QwJaAHVGScW6

• समाजाचे विविध संमेलने व्हावीत,
• व्यवसाय, व्यापार आणि शेती करणाऱ्यांना प्रोत्साहन द्यावे,
• विवाह बंधने लवकरात लवकर व्हावीत
• राष्ट्रीय कार्यकारिणीचे पुर्नगठन
• प्रत्येक गावात होत असलेल्या कार्यक्रमांचा आढावा आणि त्यात सुसूत्रता

ह्या सह विविध समाज हिताच्या विषयावर सविस्तर चर्चा करण्यात येणार आहे विविध गावातील मान्यवर समाजबांधवां समवेत एकदिवशीय *संवाद समाजाशी* या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

कार्यक्रमाची रूपरेषा पुढील प्रमाणे
२४ डिसेंबर २०२३
सकाळी – ८.०० ते ९.०० नोंदणी, चहा, नाष्टा, स्वागत किट देऊन सर्वांचे स्वागत.
९.०० ते १०.०० उद्घाटन समारोह
१०.०० ते १०.०५ ब्रेक
१०.०५ *संगीता अट्रावलकर* यांचे मनोगत विषय – *सुदृढ समाज मंथनासाठी…..*
१०.३० प्रत्येकाचा परिचय
११.०० प्रत्येक गावात सध्या सुरू असलेल्या कार्याविषयी गावातील एका प्रतिनिधीने माहिती देणे.
११.३० मान्यवरांचे मनोगत
१२.३० ते १.३० विविध विषयांवर चर्चा
१.३० ते २.०० भोजन
२.०० ते ३.०० विविध विषयांवर चर्चा
३.०० ते ३.१५ चहा/ कॉफी
३.१५ ते ३.४५ समारोप विविध ठरावांना मंजुरी

संवाद समाजाशी हा कार्यक्रम सामाजिक कार्य करण्यासाठी एक दिशा देणारा ठरणार आहे.

स्वागत मूल्य/ देणगी जमा करण्यासाठी ~
Account Name –
Chitode Wani Samaj, Jalgaon Shahar.

Bank Name –
Bank of India, Station Road, Jalgaon.

Savings Account Number – 067010110000772

IFSC -* BKID0000670
MICR -* 425013001

(टीप :कार्यक्रमात सोयीनुसार अध्यक्षांच्या परवानगीने आयत्यावेळी बदल होऊ शकतो)

 

Leave A Reply

Your email address will not be published.