अकोल्यात कार आणि ट्रकच्या भीषण अपघातात तीन जण जागीच ठार

0

अकोला 

अकोला येथे  कार आणि ट्रकच्या भीषण अपघातात तीन जण जागीच ठार झाल्याची घटना घडली. पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार एकाचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला आहे. अकोला शहरात पासून हाकेच्या अंतरावर असलेल्या राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहा वरील विधोरा येथील रिलायन्सच्या पेट्रोल पंपाजवळ मध्यरात्रीच्या सुमारास हा अपघात झाला. या अपघातात कारचा अक्षरशः चुराडा झाला आहे.

शेगाव कडून एमएच ३७ जी ८२६२ (MH 38 G 8262) ही कार वाशिमकडे जात होती. त्यावेळी विरुद्ध दिशेने जाणाऱ्या ट्रकने कारला जोरदार धडक दिली. या अपघातात कारमधील तिघांचा जागीच मृत्यू झाला, तर गंभीर जखमी झालेला चौथा उपचारादरम्यान मृत्युमुखी पडला आहे. घटनेची माहिती मिळताच बाळापूर पोलिस स्टेशनचे ठाणेदार दत्तात्रय आव्हाड आपल्या ताफ्यासह घटनास्थळी दाखल झाले.

एकाला गंभीर अवस्थेत पुढील उपचारासाठी अकोला रुग्णालयात दाखल करण्यात आले होते, परंतु उपचार घेताना जखमीचा आज सकाळी मृत्यू झाला. पुढील तपास पोलिस करत आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.