आंतरमहाविद्यालयीन वाणिज्य प्रश्न मंजुषा संपन्न

0

चाळीसगाव, प्रतिनिधी

चाळीसगाव एज्युकेशन सोसायटीच्या बी. पी. आर्टस, एस. एम. ए. सायन्स, आणि के. के. सी कॉमर्स कॉलेज आणि के. आर. कोतकर ज्युनिअर कॉलेजमध्ये गुरुवार दि. ०८/०७/२०२१ रोजी सकाळी ९:०० वाजता राजेंद्र जगन्नाथ अग्रवाल यांच्या दातृत्वतून १७ वी कै. मोतीलालजी मंगलचंदजी अग्रवाल आंतरमहाविद्यालयीन वाणिज्य प्रश्नमंजुषा स्पर्धा संपन्न झाली.

सदर स्पर्धेचे उदघाटन मा. प्रा. डॉ. किशोर पवार, संचालक परीक्षा व मूल्यमापन मंडळ, कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगाव यांच्या हस्ते करण्यात आले. उदघाटन समारंभात संस्थेचे अध्यक्ष मा. आबासाहेब प्राचार्य बी. व्ही.चव्हाण हे अध्यक्ष स्थानी होते. संस्थेचे उपाध्यक्ष मिलिंद दादा देशमुख, प्रायोजक राजेंद्र अग्रवाल, सचिव डॉ. विनोद कोतकर, सिनियर कॉलेज कमिटी चेअरमन मा. डॉ. एम. बी. पाटील, ज्युनिअर कॉलेज कमिटी चेअरमन मा.  नानासाहेब श्यामलाल  कुमावत, प्राचार्य डॉ. एम. व्ही. बिल्दीकर, उपप्राचार्य डॉ. पी. एस.बाविस्कर, उपप्राचार्य डॉ. ए. व्ही. काटे, विभाग प्रमुख प्रा. डॉ. के.एस.खापर्डे  आणि इतर सहकारी प्राध्यापक उपस्थित होते.

कार्यक्रमाचे  प्रास्ताविक प्राचार्य डॉ. एम.व्ही. बिल्दीकर यांनी केले व महाविद्यालयाविषयी माहिती देऊन स्पर्धेसाठी आलेल्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करून त्यांचे मनोबल वाढविले,  त्यांना शुभेच्छा दिल्या. स्पर्धेविषयी प्रास्ताविक प्रा.डॉ. के. एस. खापर्डे यांनी केले. उदघाटनपर मनोगतात प्रा. डॉ. किशोर पवार यांनी विद्यार्थ्यांना ऑनलाईन स्पर्धेच्या माध्यमातून आपले ध्येय कसे  साध्य करता येईल याविषयी माहिती व शुभेच्छा दिल्या. अध्यक्षीय मनोगतात प्राचार्य बी. व्हि.चव्हाण  यांनी अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत महाविद्यालयाने स्पर्धा घेतल्या पण खंड पडू दिला नाही म्हणून महाविद्यालये कौतुक केले. तसेच विद्यार्थ्यांनी अशा स्पर्धेत सहभाग घेऊन आपला सर्वांगीण विकास करावा असे मार्गदर्शन केले.

सदर स्पर्धेत  एकूण १८ संघांनी सहभाग घेतला. प्रत्येक संघात तीन विद्यार्थी असे  एकूण ५४ विद्यार्थ्यांचा सहभाग होता. ऑनलाईन पद्धतीने स्पर्धा घेण्यात आली व एकूण ५ राउंड मधून ५ संघांची निवड करून अंतिम राउंड घेण्यात आला. स्पर्धेमध्ये विजयी झालेल्या संघांना खालीलप्रमाणे पारितोषिक देण्यात आले.

प्रथम पारितोषिक रु १५०० एन. वाय. एन. सी महाविद्यालय चाळीसगाव, द्वितीय पारितोषिक रु ११००  मुळजी जेठा महाविद्यालय जळगांव, तृतीय पारितोषिक  रु७०० आर.एन. देशमुख महाविद्यालय भडगाव, उत्तेजनार्थ पारितोषिक  रु ५०० प्रताप महाविद्यालय अमळनेर  व कला, वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालय, धरणगाव यांना देण्यात आले.तसेच उत्कृष्ट विद्यार्थीना  रु २५०  कु कालिंदी शर्मा  एन. वाय. एन. सी महाविद्यालय, चाळीसगाव आणि उत्कृष्ट विद्यार्थी रु २५० आसिफ पठाण, एन. वाय. एन. सी महाविद्यालय, चाळीसगाव यांना देण्यात आले.

कार्यक्रमाच्या शेवटी प्रा. डॉ. ए.व्ही.काटे यांनी सर्व उपस्थितांचे आभार मानले. कार्यक्रमात स्पर्धा प्रमुख प्रा.सौ. पी. एन. निकम, सूत्रसंचालन प्रा.डॉ. आर.ए. कुलकर्णी, प्रा.सौ.व्ही.आर.पाटील , प्रा. आर.डी. पावरा व इतर प्राध्यापकांचे सहकार्य लाभले. तसेच विभागाचे सहाय्यक  पृथ्वीराज पाटील व कार्यालयीन प्रमुख  हिम्मत अंदोरे तसेच इतर शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे सुद्धा अनमोल सहकार्य लाभले .

Leave A Reply

Your email address will not be published.