अँड. हेमंत हनुमंतराव मुदलियार अष्टपैलू व्यक्तिमत्वाचा हिरा हरपला !

0
गुहागर कोकण येथे आयोजित आपात्ती व्यवस्थापन प्रशिक्षणात रेडक्रॉस जळगाव च्या वतीने मुदलियार यांनी प्रतिनिधित्व केले
गुहागर कोकण येथे आयोजित आपात्ती व्यवस्थापन प्रशिक्षणात रेडक्रॉस जळगाव च्या वतीने हेमंत मुदलियार यांनी प्रतिनिधित्व केले होते.

अँड. हेमंत हनुमंतराव मुदलियार यांचा जन्म १ जून, १९६८. पेशा अँडव्होकेट व नोटरी त्यांचे कार्यालय जे.टी. चेम्बर च्या तळमजल्यावर. त्यांचे शिक्षण बी.कॉ,. एल.एल.बी. डि.एल.एल. अँड एल. डब्ल्यू. त्यांच्या पश्चात एक मुलगा जो इंजिनीरिंगला शिक्षण घेत आहे व मोठी मुलगी जी चेस मध्ये नामांकित खेळाडू आहे.
अँड. हेमंत मुदलियार यांचा स्वर्गवास आज सकाळी हृदय विकाराने झाला हि हृदय विदारक मन सुन्न करणारी बातमीने प्रत्याकाचे मन दुखी व व्यथित झाले.
ते इंडियन रेडक्रॉस सोसायटीचे २६ जानेवारी १९८९ म्हणजे वयाच्या २० वर्षापासून आजीवन सभासद होते. त्यांना रक्तदान करण्याचा छंद होता व तो त्यांनी शेवट पर्यंत जोपासला. ते विक्रमी रक्तदाते होते. बहुतांशी वेळा गरज असतांना त्यांनी एस.डी.पी. डोनेशनहि केले. इंडियन रेडक्रॉस सोसायटीच्या कार्यकारिणीवर ते सन १९९९ ते २००६ व सन २०१४ ते सन २०१७ पर्यंत होते. इंडियन रेडक्रॉस सोसायटी राज्य शाखा, मुंबई आयोजित राज्य आपत्ती व्यवस्थापन प्रशिक्षणात गुहाघर येथे २५ मार्च २०१० ते २९ मार्च, २०१० व महाड येथे १२ जुलै, २०१० ते २१ जुलै, २०१० मध्ये सहभाग घेतला. महाराष्ट्र असोशीएशन ऑफ ब्लड बँकच्या वार्षिक सर्वसाधारण सभेला त्यांनी रेडक्रॉस जिल्हा शाखा, जळगावचे प्रतीनिधीत्व केले. या व्यतिरिक्त ते जळगाव जिल्हा होम गार्ड विभागाचे समादेशन या पदावर दीर्घकाळ सेवा दिली. त्यांचे कुटुंबियांवर पत्नी, मुलगा, मुलगीवर अतोनात प्रेम होते
त्यांनी त्यांच्या वकिली पेशावर नोटरी व्यवसायात इमाने इतबारे सचोटीने काम केले. त्यांचा मित्र परिवार मोठा. त्यांचे सर्वांशी जीवाभावाचे ऋणानुबंध होते. त्यांचे प्रेम, स्नेहभाव अतुलनीय होता. ज्यांना ज्यांना त्यांचा सहवास लाभला तो अल्पसा का होईना परंतु स्मरणीय असा होता.
आपल्या कुटुंबियांतील प्रत्येक सदस्यांशी व त्यांच्याशी ज्यांचा संबंध आलेला आहे त्या प्रत्येकाशी ते जिवाभावाने व प्रेमाने वागत याची जाणीव त्यांचे कुटुंबीय सदस्य, सहयोगी, नातेवाईक व मित्रपरिवार यांना सदोदित होत राहील. त्यांचे कार्य अनमोल, त्यांची नि:स्वार्थ सेवा, त्यांचे स्वच्छ मन, निर्मळ भावना, हळवा स्वभाव, हसतमुख त्यामुळे त्यांच्याशी सर्वजण आपुलकीने व आदराने वागत.
जो आवडे सर्वांना तोची आवडे देवाला. अवघ्या ५३ वर्षाचे असतांना परमेश्वराने त्यांना आपल्यातून हिरावून नेले. मनुष्य वयाने नव्हे तर स्व कर्तुत्वाने मोठा होतो ! त्यांच्या कुटुंबीयास व आपल्या सर्वास या दु:खद प्रसंगी आपणास दु:ख पचविण्याची शक्ति परमेश्वर निश्चितच प्रदान करतील ! त्यांचे कुटुंबीयावर, आप्तगण, स्वकीय, मित्रगण यांच्यावर आलेला हा दुख:द प्रसंगातून परमेश्वर सर्वांना बळ देवो व ईश्वर स्वर्गस्थ आत्म्यास चिरशांती प्रदान करो ! ही भावना व्यक्त करून रेडक्रॉस परिवार श्रद्धांजली अर्पण करीत आहे.

आठवणीने त्यांच्या स्मृती सुगंध फुलावा ….
वात्सल्याचे स्पंदन हृदयी स्पर्शून जावा ..
हि छाप कर्तुत्वाची तुजसम असावी …
आदर्श जीवनाचा कुटुंबात ती दिसावी …
———————————————————————————————————–
नसे मागणे तुला आता रे एक प्रार्थितों तव चरणाशी
शांती लाभो आत्म्याला त्या हीच सदिच्छा हृदयाशी
ओम शांति शांति शांति !

– रेडक्रॉस जळगाव प्रशासकीय अधिकारी लक्ष्मण तिवारी

Leave A Reply

Your email address will not be published.