निराधारांना फैजपूरातून आधार ; सिंधुताई सपकाळ आश्रमास आर्थिक मदत

0

फैजपूर प्रतिनिधी : अनाथांच्या आई पद्मश्री सिंधुताई सपकाळ यांचे निराधार आश्रम सद्यः स्थितीत कोरोना प्रादुर्भावामुळे आर्थिक अडचणीत आलेला आहे. अशा कठीण परिस्थितीत निराधार मुलांना आधार देणे आवश्यक आहे. याकरीता फैजपूर शहरातून सुमारे एक लाख एकवीस हजाराची मदत तातडीने रवाना केल्याची माहिती म.स.सा.का. संचालक नरेंद्र विष्णू नारखेडे यांनी दिली.

याबाबत सविस्तर वृत्त असे की, पद्मश्री सिंधुताई सपकाळ यांनी समाजातील निराधार बालकांचे संगोपन करण्यासाठी संपूर्ण आयुष्य समर्पीत केले आहे. आजपर्यंत सुमारे १००० मुले सज्ञान होऊन बाहेर पडले आहे. पुण्याजवळील मांजरी बु. शिवारात माईंचा “मनशांती छात्रालय” असून येथे  ५० मुले आश्रयास आहे. सासवड येथील केंद्रात ७५ मुली व शिरुर येथील केंद्रात ५० मुले चिखलदरा येथे ७५ मुली, वर्धा येथे २५० भाकड गायी असून या सर्वांचा पालन पोषणांचा खर्च भागवावा लागतो. सद्यः स्थितीत कोरोनामुळे माईंचे सर्व कार्यक्रम बंद असल्यामुळे, आर्थिक मदतीचा ओघ थांबल्यामुळे या निराधार बालसंगोपन केंद्राकरीता किराणा व अन्नधान्याचा तुटवडा निर्माण झाला आहे. यावर मात करण्यासाठी फैजपूर शहरवासीयांनी मदतीचा हात देण्याचे ठरविले असून तातडीने एक लाख एकवीस हजार रक्कम पाठवली गेली आहे.

याकरीता म.स.सा.का. संचालक नरेंद्र नारखेडे यांनी पुढाकार घेवून मित्र परिवार व सहकारी संस्थांचे मदतीने या निराधारांना आधार देण्याचे ठरविले आहे. या कार्याकरीता सातपुडा अर्बन सहकारी पतसंस्था, कै. देविदास टिकाराम चौधरी नागरी सह. पतसंस्था, श्री. लक्ष्मी नागरी सह. पतसंस्था, कै. दादासाहेब वसंतराव पाटील औदयोगिक सह. संस्था यांनी प्रत्येकी रु.२५,०००/- आर्थिक मदत यामध्ये केली असून नरेंद्र नारखेडे, अनिल नारखेडे यांचे परिवारसह मित्रमंडळींनी सुध्दा ५१ हजारांची मदत केली आहे. सिंधूताई यांचे पूर्व आयुष्य फैजपूर शहरात वास्तव्य राहीले असल्यामुळे फैजपूर हे माईंनी माहेर मानले असून भावनिक नाते जुळले आहे. या कार्याकरीता औदयोगिक वसाहत चेअरमन मनोजकुमार पाटील, प्रांताधिकारी, कैलास कडलगसाहेब, – सातपुडा अर्बनचे व्हा.चेअरमन, चंद्रशेखर चौधरी, अंबिका दुध डेअरीचे चेअरमन, हेमराज चौधरी, डॉ. पदमाकर पाटील, पांडूरग सराफ, विलास नेमाडे, जयप्रकाश चौधरी, अनिल नारखेडे, नितीन चौधरी, अप्पा भालचंद्र चौधरी, विजयकुमार परदेशी, निळकंठ सराफ, खेमचंद नेहेते, गिरीश पाटील, किरण चौधरी, पत्रकार योगेश सोनवणे, यांचेसह असंख्य मित्रपरिवाराचे सहकार्य लाभत आहे. अशीच मदत यापुढेही करावी अशी नम्र विनंती, नरेंद्र नारखेडे यांनी केली आहे. अधिक माहिती संस्थेचे स्वयंसेवक विनय सपकाळ, पुणे ९०४९४७४५४४, ८६००७६००१४ या फोनवर संपर्क साधावा.

फैजपूर ची मदत म्हणजेच माहेरची साडी

आमच्या निराधार आश्रमाला फैजपूर वासियांकडून मिळालेली मदत म्हणजे “माहेरची साडी चोळी व बांगडी” होय.

– पद्मश्री सिंधुताई सपकाळ

Leave A Reply

Your email address will not be published.