जागतिक महिला दिना कार्यक्रमांचे उद्घाटन संपन्न

0

जळगाव दि. 6-

शहर महानगरपालिका महिला व बाल कल्याण विभागातर्फे जागतिक महिला दिनानिमित्त दिनांक 06 मार्च ते 08 मार्च या कालावधीत विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. त्यानुसार बुधवार दि. 6 रोजी सकाळी 10.00 वाजता मनपाच्या छत्रपती शाहू महाराज रुग्णालयात महापौर सिमा भोळे यांचेहस्ते महिला दिन कार्यक्रमांचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी शहरातील व बचत गटातील महिलांसाठी हिमोग्लोबीन व आरोग्य तपासणी करण्यात आली व महिलांना हिमोग्लोबीन वाढीसाठी गोळ्यांचे मोफत वाटप करण्यात आले.
यानंतर सकाळी 11.30 वाजता मनपा सभागृहात महिलांकरीता आरोग्य विषयक मार्गदर्शनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता, यावेळी स्त्री रोगतज्ञ डॉ.सुजाता महाजन यांनी महिलांच्या आरोग्यविषयी मार्गदर्शन केले तसेच इंडियन डेन्टल असेासिएशन शाखा जळगांवतर्फे डॉ. अंशुमा जैन, डॉ. स्नेहल वाघ, डॉ. सोनल नंदर्षी, डॉ.मेघना नारखेडे, डॉ.सिमरन जुनेजा यांनी दंत व मुख रोगासंबंधी मार्गदर्शन केले. याप्रसंगी उत्कृष्ठ कार्य करणारे मनपाचे डॉक्टर्स व नर्सेस यांचा पुस्तक व पुष्पगुच्छ देवून सत्कार करण्यात आला.
यावेळी महापौर सिमा भोळे यांचेसह महिला व बाल कल्याण समिती सभापती मंगला चौधरी, नगरसेविका रेश्मा काळे, सरिता नेरकर, सुरेखा तायडे, दिपमाला काळे, रंजना वानखेडे, रेखा पाटील, गायत्री राणे, भारती सोनवणे, अ‍ॅड. शुचिता हाडा, उपायुक्त चंद्रकांत खोसे, लक्ष्मिकांत कहार, सुभाष मराठे, किशोर भुतडा, शितल शंभरकर, संजय लोंढे, लक्ष्मण सपकाळे, देवकर कोळी, कल्याणी वर्दे तसेच शहरातील बचत गट बालवाडी शिक्षिका मदतनीस यांची उपस्थिती होती.

Leave A Reply

Your email address will not be published.