स्वच्छ भारत अभियानांतर्गत जळगाव देशात 76 व्या स्थानी

0

जळगाव –स्वच्छ भारत अभियानांतर्गत देशात जळगावला 76 व्या स्थानी येण्याचा बहुमान प्राप्त झाला आहे. तर शहरात बंद अवस्थेत असलेल्या घनकचरा प्रकल्पामुळे शहर पिछाडीवर पडले. तर शेजारचे नाशिक 67 व्या स्थानी तर अमरावती 75 व्या स्थानी असून जळगाव 76 व्या स्थानी आहे. देशातील प्रथम क्रमांकाचे स्वच्छ शहर म्हणून इंदौरने सलग तिसर्‍यांना बाजी मारली असल्याची माहिती बुधवारी आयुक्त चंद्रकांत डांगे यांनी दिली.
घनकचरा प्रकल्प व ओडीएफ प्लसमुळे पिछाडीवर
शहरातील बंद असलेला घनकचरा प्रकल्पामुळे शहर स्वच्छ अभियानात पिछाडीवर गेले आहे. स्वच्छता पथक तपासणीसच न आल्याने ओडीएफ प्लसचे गुण न मिळाल्यामुळे 1250 पैकी 1173 गुण मिळाले. शहरातील महाविद्यालयांनी केलेल्या वॉल पेन्टींगमुळे ग्रिनीज बुक इंडियामध्ये नाव कोरले गेले यासह स्वच्छता अभियानाच्या रँकिंगमध्ये फायदा झाला आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.