किनगावात पैशासाठी विवाहित महिलेचा छळ

0

लोकशाही न्युज नेटवर्क :

 

जळगाव 

जळगाव – मीना फिरोज तडवी (वय 30) यांचे जळगाव शहरातील रामनगर माहेर आहे . विवाहितेने घर घेण्यासाठी माहेरहून १० लाख रुपये आणावे यासाठी छळ करणाऱ्या पतीसह ५ जणांविरोधात एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

त्‍यांचा विवाह २०२१७ मध्ये फिरोज सरदार तडवी ( रा. किनगाव ता. यावल) यांच्याशी झाला. विवाहिता सासरी नांदत असताना पती फिरोज तडवी याने मुंबई येथे घर घेण्यासाठी आणि टीईटी परीक्षा पास होण्यासाठी माहेरहून १० लाख रुपये आणावे अशी मागणी केली.परंतु ही मागणी विवाहितेच्या नातेवाइकांनी पूर्ण न केल्यामुळे पती फिरोज तडवी याने विवाहितेला शिवीगाळ करून मारहाण केली सासू, सासरे, दीर यांनी दमदाटी करून गांजपाठ केला.

या छळाला कंटाळून विवाहिता जळगाव येथील माहेरी निघून आल्या. २८ डिसेंबररोजी त्यांनी एमआयडीसी पोलीस ठाण्यात तक्रार दिली. त्यांच्या तक्रारीवरून पती फिरोज तडवी, सासू मुमताज तडवी, सासरे सरदार तडवी, दीर शाहरुख तडवी आणि मुक्तार तडवी ( सर्व रा. किनगाव ) यांच्याविरोधात एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोहेकॉ नितिन पाटील करीत आहेत .

Leave A Reply

Your email address will not be published.