मुंबई क्रुझ ड्रग्स प्रकरण; नवाब मलिकांचा मोठा गौप्यस्फोट..

0

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क 

काही दिवसांपासून  मुंबई क्रुझ ड्रग्ज प्रकरणात आर्यन खानसह अनेक आरोपी अटकेत आहेत. या प्रकणावरुन सध्या देशातील राजकारण चांगलंच तापलं आहे. मुंबई क्रुझ आणि ड्रग्ज प्रकरणावर एनसीबी भाजपच्या सांगण्यावरुन कारवाई करत असल्याचा आरोप राष्ट्रवादी काॅंग्रसचे नेते आणि अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांनी केला आहे. अशातच आता पत्रकार परिषद घेत नवाब मलिकांनी मोठा गौप्यस्फोट केला आहे.

रेव्ह पार्टीतून एनसीबीनं  ज्या लोकांना ताब्यात घेतलं त्या वेळी एकूण 11 जणांना पकडलं होतं. त्यापैकी तीन जणांना सोडण्यात आलं, असल्याचा गौप्यस्फोट नवाब मलिक यांनी केला आहे. त्यातला एक व्यक्ती भाजपाच्या पदाधिकाऱ्याचा मेहुणा आहे, असा दावा मलिकांनी केला होता. त्यांनी आता या भाजप पदाधिकाऱ्याचं नाव जाहीर केलं आहे.

यावेळी मलिकांनी सवाल केली की,  भारतीय जनता युवा मोर्चाचे माजी अध्यक्ष मोहित भारती यांचा मेहुणा वृषभ सचदेवा, आमिर फर्निचरवाला आणि प्रतिक गाभा यांना एनसीबीनं का सोडलं?

तसेच नवाब मलिकांनी म्हटलं की, समीर वानखेडे तसेच एनसीबीच्या अधिकाऱ्यांचे कॉल रेकॉर्ड्स तपासावे. ही सर्व छापेमारी बनावट आहे. या प्रकरणी केंद्रानं एक समितीची स्थापना करावी आणि त्याची चौकशी करण्यात यावी. सध्या हे प्रकरण एका वेेगळ्याच दिशेनं जात असल्याचं पहायला मिळत आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.