पंढरपूर देशातलं सर्वात स्वच्छ तीर्थस्थळ बनवणार; पंतप्रधान मोदींचा वारकऱ्यांना शब्द (व्हिडीओ)

0

पंढरपूर, लोकशाही न्यूज नेटवर्क 

पंढरपूर ते आळंदी  या संत ज्ञानेश्वर महाराज पालखी आणि देहू ते पंढरपूर या संत तुकाराम महाराज पालखी महामार्गाचं  भूमिपूजन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते पार पडलं. यावेळी पंतप्रधान मोदींनी मराठीतून रामकृष्ण हरी म्हणत वारकऱ्यांशी संवाद साधला.

पंतप्रधान नरेंद्र मोदी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे या सोहळ्याला उपस्थित राहिले. या सोहळ्याला केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरेही ऑनलाईन उपस्थित होते. यावेळी बोलत असताना पंतप्रधान मोदी यांनी मराठीतून वारकऱ्यांशी संवाद साधला. ‘रामकृष्ण हरी..काल आद्य शंकराचार्यांच्या समाधीची सेवा करता आली आणि आज पंढरपूरला जोडला गेला.

मला अतिशय आनंद होतोय संत ज्ञानोबा माऊली आणि तुकोबारायांच्या पालखी महामार्गाचे उद्घाटन करण्याचं भाग्य मला लाभले आहे, असं म्हणत मोदींनी भाषणाला सुरुवात केली. ‘देशावर अनेक संकटं आली, हल्ले झाले पण वारकऱ्यांची वारी ही कायम चालू राहिली यामध्ये कोणताही खंड पडला नाही. आषाढी यात्रेतील विहंगम दृश्य कोणी ही विसरू शकत नाही. एक असाधारण संयम पाहायला मिळतो.

मार्ग अलग अलग असू शकतात मात्र आमचे लक्ष एक आहे. आम्ही सर्व भागवत पंथी आहोत, असंही मोदी म्हणाले. अनादी काळापासून अनेक संकट आली पण पालखी सुरू राहिली, विठोबाच्या प्रती असलेली श्रद्धा कमी होत नाही. वारीत जातपात भेदभाव नसतो. सगळे एकमेकांचे गुरुभाऊ गुरू बहीण सगळी विठ्ठलाची लेकर. पण म्हणतो ना माझे माहेर पंढरी आहे भिवरेच्या तीरी. माझं पंढरपूरशी वेगळं नात आहे. मी गुजरातमधून आहे, भगवान श्री कृष्णाचे अवतार श्री विठ्ठल आहेत.

मी काशीमधून आहे आणि पंढरपूर ही दक्षिणेची काशी आहे. पंढरपूर दक्षिण काशी आहे म्हणून पंढरपूरची सेवा साक्षात परमेश्वर नारायणाची सेवा आहे, असंही मोदी म्हणाले. ‘या भूमीने भारताला चैतन्य दिले. वेळोवेळी या भूमीने आपल्याला बरंच काही दिलं आहे. वारीमध्ये महिला सुद्धा खांद्याला खांदा लावून सहभागी होत असतात. भेदाभेद अमंगळ हे सामाजिक समरस्ताचा उद्घोष आहे. सर्वजण एकमेकांना माऊली म्हणून हाक मारतात. माऊली म्हणजे, आई. त्यामुळे महिला आणि मातृत्वाचा हा सन्मान आहे, असंही मोदी म्हणाले.

पालखी महामार्ग तयार होईल, तेव्हा रस्त्याच्या बाजूला झाडे लावण्याचे काम घेतले पाहिजे. झाडं लावल्यामुळे अनेकांना विसावा मिळेल. पदमार्गावर प्रत्येक ठिकाणी पाण्याची व्यवस्था करण्यात यावी. वारकरी जेव्हा या रस्त्याने जातील तेव्हा त्यांना याचा मोठा फायदा होईल. मी भविष्यात पंढपुरला भारतातील सर्वात स्वच्छ तिर्थस्थळ तयार करायचे आहे. यासाठी तुम्ही सर्वांनी मला साथ दिली पाहिजे. जनचळवळीतून हे स्वप्न आपण साकारू शकतो, असं आवाहनही मोदींनी  यावेळी केलं.

Leave A Reply

Your email address will not be published.