जिल्हा परिषद प्राथमिक शाळा सिंदगावचे NMMS परीक्षेत घवघवीत यश…

0

 

तुळजापूर, लोकशाही न्यूज नेटवर्क;

 

महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेकडून घेण्यात आलेल्या एन.एम.एम.एस या परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर करण्यात आला. ग्रामीण भागातील गुणवंत विद्यार्थ्यांच्या शिक्षणाला प्रोत्साहन देण्यासाठी सदर परीक्षा घेऊन गुणवंत विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती प्रदान करण्यात येते. या शिष्यवृत्ती परीक्षेत जिल्हा परिषद प्राथमिक शाळा सिंदगावचे सात विद्यार्थी पात्र झालेले आहेत. यामध्ये सना नदाफ, प्रतीक परशेट्टी, जान्हवी चव्हाण, वैष्णवी स्वामी, श्रावणी ताडकर, सुरज भोसले व प्रिया कांबळे हे विद्यार्थी यशस्वी झाले आहेत. या विद्यार्थ्यांना मुख्याध्यापक, वर्गशिक्षक यांचे मार्गदर्शन लाभले. या यशाबद्दल विस्तारअधिकारी पवार साहेब, शालेय व्यवस्थापन समितीचे सदस्य व पालक अभिनंदन करत आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.