युवारंगचे विजेतेपद मू.जे. महाविद्यालयाला तर प्रताप महाविद्यालय उपविजेता

0

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क  

कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचा विद्यार्थी विकास विभाग आणि के.सी.ई. संस्थेचे मूळजी जेठा महाविद्यालय, जळगाव यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित युवारंग युवक महोत्सवात जळगावच्या मुळजी जेठा महाविद्यालयाने सर्वसाधारण विजेतेपद प्राप्त केले. तर प्रताप महाविद्यालय, अमळनेरचा संघ उपविजेता ठरला. बुधवार दि. ११ ऑक्टोबर रोजी महोत्सवाचा समारोप मोठ्या जल्लोषात झाला. बुधवारी सिने कलावंत सुरभी हांडे यांच्या हस्ते पारितोषिक वितरण झाले. अध्यक्षस्‍थानी प्र-कुलगुरू प्रा. एस.टी. इंगळे तर प्रमुख पाहुणे म्हणून आ. सुरेश भोळे उपस्थित होते. यावेळी के.सी.ई. संस्थेचे पदाधिकारी ॲङ प्रविणचंद्र जंगले, ज्ञानदेव पाटील, भालचंद्र पाटील, प्राचार्य ए. आर. राणे तसेच कुलसचिव डॉ. विनोद पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती. मंचावर व्यवस्थापन परिषद सदस्य नितीन झाल्टे, प्रा.एस.टी.भुकन, प्रा. शिवाजी पाटील, प्रा. सुरेखा पालवे, डॉ. पवित्रा पाटील, सीए रवींद्र पाटील तसेच विद्यार्थी विकास संचालक डॉ. जयेंद्र लेकुरवाळे, प्राचार्य स.ना. भारंबे, समन्वयक डॉ. जुगलकिशोर दुबे, डॉ. मनोज महाजन यांची उपस्थिती होती.

यावेळी बोलतांना सुरभि हांडे यांनी विद्यार्थ्यांशी मुक्त संवाद साधत त्यांच्या प्रश्नांना उत्तरे दिली. त्या म्हणाल्या की, स्पर्धेतील सहभागामुळे आत्मविश्वास वाढतो. सोशल मिडीयाचा फायदा तरूण पिढीला होत आहे. मी मूळजी जेठा महाविद्यालयात शिकत असतांना शिक्षकांकडून खूप काही शिकले. त्याच महाविद्यालयात माझे कौतुक होत आहे याचा खुप आनंद आहे असे त्या म्हणाल्या.

आ. सुरेश भोळे यांनी महाविद्यालयात शिकतांना उत्तम गुण घेवून पदवी प्राप्त करा आणि आई वडिलांचे स्वप्न पूर्ण करा. मात्र स्वत:मधील कलेचा विकास करा. स्वागताध्यक्ष भालचंद्र पाटील यांनी स्वयंशिस्त महत्वाची असून वेळेचे व्यवस्थापन करण्याचे आवाहन केले. संचालक डॉ. जयेंद्र लेकुरवाळे यांनी महोत्सवाचा आढावा घेतांना या महोत्सवात ११८९ सहभागी विद्यार्थ्यांपैकी ४७५ विद्यार्थी व ७१३ विद्यार्थिंनींचा सहभाग होता असे सांगितले.
यावेळी संघ व्यवस्थापकांच्या वतीने डॉ. नलिनी पाटील, प्रा. अजबराव इंगळे, प्रा. सरीता पाडवी, विद्यार्थी कलावंतांच्या वतीने सायली महाजन, अपुर्वा शहा, धर्मेश हिरे व क्रांती मोरे यांनी मनोगत व्यक्त केले. महाराष्ट्राची हास्य जत्रा या मालिकेतील कलावंत व मु.जे. महाविद्यालयातील प्रा. हेमंत पाटील यांचा प्र-कुलगुरुंच्या हस्ते सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्र संचालन प्रा. भाग्यश्री भलवतकर व प्रा. योगेश महाले यांनी केले. समन्वयक प्रा. जुगलकिशोर दुबे यांनी आभार मानले.

या कार्यक्रमास अधिसभा सदस्य  प्राचार्य के.बी. पाटील, प्राचार्य सुनील पाटील, प्राचार्य सुनील पवार, प्रा. पदमाकर पाटील, प्रा. संदीप नेरकर, प्रा. गजानन पाटील, प्रा. जयवंत मगर, प्रा. अजय पाटील, अमोल मराठे, सुनील निकम, अमोल सोनवणे, दिनेश चव्हाण, स्वप्नाली महाजन, नितीन ठाकूर, भानुदास येवलेकर, नेहा जोशी, दीपक पाटील, डॉ. ऋषिकेश चित्तम,  डॉ. संजय पाटील, प्रा. मंदा गावित,  यांच्यासह विद्या परिषदेचे व विविध प्राधिकरणाचे सदस्य व प्राचार्य गौरी राणे, प्राचार्य अनिल पाटील, प्राचार्य एस.आर. पाटील, संघ व्यवस्थापक, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, विविध समिती सदस्य्, विद्यार्थी व विद्यार्थिनी उपस्थित होते.

Leave A Reply

Your email address will not be published.