खोट्या बातम्या पसरविणाऱ्या यूट्यूब चॅनल्सवर बंदी

0

दिल्ली, लोकशाही न्यूज नेटवर्क

केंद्र सरकारनं (Central Govt) मोठी कारवाई करून ६ यूट्यूब (YouTube) चॅनलवर बंदी घातली आहे. या सहा चॅनलवर खोट्या बातम्या (Fake News) प्रसारित केल्याचा आरोप आहे. पीआयबी (PIB) फॅक्ट चेक टीमनं या यूट्यूब चॅनेलवरील खोट्या बातम्यांचा पर्दाफाश केला होता, त्यानंतर माहिती आणि प्रसारण मंत्रालयानं (Ministry of Broadcasting) त्यांच्यावर बंदी घातली आहे. पीआयबीच्या फॅक्ट चेक टीमनं फेक न्यूजमधून कमाई करणाऱ्या ६ चॅनेलचे १०० हून अधिक व्हिडिओ तपासले असता हे सर्व व्हिडिओ बनावट बातम्यांवर आधारित आहे.

मागील महिन्यात सरकारनं अशी यूट्यूब चॅनेल बंद करण्याबद्दल भाष्य केलं होतं, ज्यामध्ये खोट्या बातम्या प्रसारित केल्या जात आहेत. त्यावेळी सरकारनं विविध लोककल्याणकारी उपक्रमांबद्दल खोटी आणि खळबळजनक दावे, खोट्या बातम्या पसरवल्याबद्दल यूट्यूबला तीन चॅनेलवर बंदी घालण्यास सांगितलं होतं. त्यावेळी पीआयबीच्या फॅक्ट चेक युनिटने तीन चॅनेल फेक न्यूज पसरवत असल्याचं घोषित केलं होतं. मीडिया रिपोर्टनुसार, त्यावेळी माहिती आणि प्रसारण मंत्रालयानं यूट्यूबला आज तक लाइव्ह, न्यूज हेडलाईन्स आणि सरकारी अपडेट्स हे तीन चॅनेल काढून टाकण्याचे निर्देश दिले होते. आज तक लाइव्ह इंडिया टुडे ग्रुपशी संबंधित नसल्याचं सरकारनं स्पष्ट केलं होतं.

Leave A Reply

Your email address will not be published.