घरासमोरून पाण्याची मोटार लंपास

0

लोकशाही न्यूज नेटवर्क
एकाच्या घरासमोरून १० हजार रुपये किमतीची पाण्याची मोटार अज्ञात चोरट्याने चोरून नेल्याची घटना जामनेर तालुक्यातील सूनसगाव येथे घडली असून याबाबत जामनेर पोलीस स्टेशनला अज्ञात चोरट्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सूत्रांनी दिलेली माहिती अशी कि , अरुण सिताराम पाटील (वय-६८, रा. सूनसगाव ता. जामनेर) हे आपल्या परिवारासह राहतात. . १० जानेवारी रोजी रात्री ९ ते ११ जानेवारी रोजी सकाळी १० वाजेच्या दरम्यान त्यांच्या घरासमोर ठेवलेली १० हजार रुपये किमतीची पाण्याची मोटार अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्याचे उघडकीला आले आहे. याबाबत जामनेर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा पुढील तपास पोहेकॉ सचिन पाटील करीत आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.