एरंडोल येथे महिलेवर लोखंडी वस्तूने वार

0

लोकशाही न्यूज नेटवर्क
घरगुती भांडणाच्या कारणावरून महिलेला शिवीगाळ करून जीवेठार मारण्याची धमकी देत लोखंडी वस्तूने डोक्याला मारहाण करून जखमी केल्याची घटना एरंडोल शहरातील वृंदावन नगरात घडली आहे. याबाबत एरंडोल पोलीस ठाण्यात एकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

कीर्ती किरण पाटील (वय-४०, रा.वृन्दावन नगर, एरंडोल) या राहतात. ४ जानेवारी रोजी सायंकाळी ६ वाजेच्या सुमारास घरगुती भांडणाच्या कारणावरून किरण अशोक पाटील रा. जहांगीरपुरा एरंडोल याने महिलेला शिवीगाळ करून जीवेठार मानाची धमकी दिली. तसेच त्याच्या हातातील लोखंडी वस्तू महिलेच्या डोक्यात मारून गंभीरज दुखापत केल्याची घटना घडली. महिलेला खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. यानंतर महिलेने दिलेल्या जबाबवरून संशयित आरोपी किरण अशोक पाटील रा. जहांगीरपुरा, एरंडोल यांच्या विरोधात एरंडोल पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा पोलीस हेडकॉन्स्टेबल सुनील लोहार पुढील तपास करीत आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.