ज्येष्ठ नागरिकांच्या योजनांची अंमलबजावणी करण्यास प्रशासन कटीबध्द – जिल्हाधिकारी आयुष प्रसाद

0

जळगाव, ज्येष्ठ नागरिकांच्या कल्याणासाठी राज्य शासनाच्या वतीने अनेक योजना राबविण्यात येत असतात. या योजनांची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी जिल्हा प्रशासन कटीबध्द आहे. अशा विश्वास जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी आज येथे व्यक्त केला.

सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या सहायक आयुक्त कार्यालयाच्या वतीने डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन येथे जागतिक ज्येष्ठ दिनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. त्यावेळी प्रमुख पाहूणे म्हणून जिल्हाधिकारी श्री प्रसाद बोलत होते. याप्रसंगी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अंकित, महानगरपालिका आयुक्त डॉ.विदया गायकवाड, समाजकल्याण सहाय्यक आयुक्त योगेश पाटील तसेच अॅड. श्री. सुशिल अत्रे, डॉ शशिकांत गाजरे, फेसकॉमचे प्रतिनिधी डी टी चौधरी, जगतराव पाटील आदी उपस्थित होते.

श्री प्रसाद म्हणाले की, ज्येष्ठ नागरिकांनी संस्कारांची शिदोरी भावी पिढीला देण्यासह आनंददायी जीवन जगण्याला प्राधान्य द्यावे.‌

अॅड श्री सुशिल अत्रे यांनी आई, वडील व जेष्ठ नागरीक यांच्या चरीतार्थ व कल्याणासाठी अधिनियम २००७ मधील विविध कलमांची सोप्या पध्दतीत मांडणी केली. तर डॉ श्री शशिकांत गाजरे यांनी वृध्दापकाळात ज्येष्ठांनी आरोग्यविषयक घ्यावयाची काळजी याबाबत मार्गदर्शन केले. फेसकॉमचे प्रतिनिधी श्री डी टी चौधरी, श्री जगतराव पाटील यांनीही यावेळी मनोगत व्यक्त केले.

ज्येष्ठ नागरिक दिनांचे औचित्य साधून ज्येष्ठ नागरिकांना प्रातिनिधीक स्वरूपात मतदार ओळखपत्र जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते वितरीत करण्यात आले.

कार्यक्रमाची सुरुवात महाराष्ट्र गीताने झाली तर समारोप राष्ट्रगीताने झाला. या कार्यक्रमाचे आयोजन समाज कल्याण सहायक आयुक्त योगेश पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले. सूत्रसंचालन विनोद ढगे यांनी केले. आभार कार्यालय अधीक्षक राजेंद्र कांबळे यांनी मानले‌. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी अधिकारी, कर्मचारी व बार्टीचे तालुका समन्वयक आदींनी परिश्रम घेतले.

Leave A Reply

Your email address will not be published.