यावल युवक राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे महागाई विरोधात निदर्शने

0

यावल, लोकशाही न्यूज नेटवर्क 

जिल्हा राष्ट्रवादी युवक काँग्रेस जिल्हाध्यक्ष तथा जिल्हा परिषद सदस्य रवींद्र पाटील व राष्ट्रवादी युवक काँग्रेस यावल तालुका अध्यक्ष ॲड. देवकांत पाटील यांच्या नेतृत्वात यावल तालुक्याच्या वतीने यावल तहसील परिसरात राज्य सरकारचा व केंद्र सरकारचा निषेध करत महागाईच्या विरोधात यावल तहसीलदार यांना निवेदन देण्यात आले.

राज्य सरकार व केंद्र सरकारच्या विरोधात उपहासात्मक घोषणा देत 50 खोके एकदम ओके म्हणत प्रत्यक्षात खोक्यांवर नकली नोटा चिपकवलेल्या खोके घेऊन निदर्शने करण्यात आली.

याप्रसंगी निवेदन देताना राष्ट्रवादीचे जिल्हा उपाध्यक्ष रवींद्र पाटील, यावल तालुका अध्यक्ष मुकेश येवले, जिल्हा उपाध्यक्ष योगेश पाटील, राष्ट्रवादी युवक जिल्हा सरचिटणीस विनोद लीलाधर पाटील, राजू काशिनाथ पाटील, राष्ट्रवादीचे समन्वयक किशोर माळी, राष्ट्रवादी कार्याध्यक्ष नरेंद्र शिंदे, विरावली विकास सोसायटीचे व्हाईस चेअरमन नरेंद्र सोनवणे, समाधान पाटील, राहुल चौधरी, शाहरुख तडवी, पवन खर्चे, हेमंत दांडेकर, सरदार तडवी, गिरीश शिरसागर, विजय भोई, अजय मोरे, लक्ष्मण बारेला, मन्साराम पाटील, ज्ञानेश्वर सोनवणे, बिस्मिल्ला तडवी, प्रशांत पाटील यासह असंख्य युवक राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांची उपस्थिती होती.

Leave A Reply

Your email address will not be published.