घराचे कुलूप तोडून सव्वा दोन लाखाचे दागिने लंपास

0

यावल, लोकशाही न्यूज नेटवर्क 

तालुक्यातील मालोद येथील एका शेतकऱ्याच्या घराचे दरवाजाचे कुलूप तोडून अज्ञातांनी घरातून दोन लाख एकोणवीस हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागिने लंपास केल्याचा प्रकार दि. 31 जुलै रोजी रात्री घडला.

मालोद येथील मुरलीधर वना पाटील (वय 63) यांच्या स्वयंपाक घराचे लोखंडी दरवाजाचे कुलूप तोडून अज्ञात इसमांनी दोन लाख एकोणवीस हजार रुपयाचे सोन्याचे दागिने दि. 31 जुलै रोजी रात्री साडेदहा ते साडेअकरा वाजेचे दरम्यान लंपास केल्याची घटना घडली आहे.

याबाबत मुरलीधर पाटील यांनी यावल पोलिसात फिर्याद दिल्यावरून अज्ञात व्यक्तींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. याप्रकरणी पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक सुदाम काकडे हे करीत आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.