तापी नदीत बुडून तरुणाचा दुर्दैवी मृत्यू

0

यावल, लोकशाही न्युज नेटवर्क 

तालुक्यातील भालशिव पिंप्री गावातील मासे पकडण्यासाठी गेलेल्या तरूणाचा तापी नदीच्या पात्रात बुडून दुर्दैवी अंत झाला. याबाबत पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहिती नुसार गुलाब बारकु भिल (वय ३०, रा. भालशिव पिंप्री तालुका यावल) मासे विकून आपला उदरनिर्वाह करत होता. दि. ३ जानेवारी रोजी सायंकाळी ५ वाजेच्या सुमारास आपले भाऊ संतोष बारकु भिल (वय २३) हे दोघ भाऊ नेहमीप्रमाणे भालशिव पिंप्री शिवारालगत असलेल्या तापी नदीच्या पात्रात मासे पकडण्यासाठी गेले असता, संतोष भिल हा रात्री आपल्या घरी आला मात्र गुलाब भिल हा त्याचा मोठा भाऊ रात्री उशीरा पर्यंत घरी न आल्याने त्याचा शोध घेतला असता दिनांक ४ जानेवारी रोजी सकाळी ६ वाजेच्या सुमारास तापी नदीच्या पात्रात त्याचा मृतदेह तरंगतांना दिसुन आला.

यावेळी मयत गुलाब भिलचा मृतदेह गावातील लोकांच्या मदतीने पाण्याबाहेर काढण्यात आला. त्याच्या मृतदेहावर यावलच्या ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदन करण्यात आले. या संदर्भात मयताचा भाऊ संतोष बारकु भिल यांने खबर दिल्याने यावल पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्युची नोंद करण्यात आली. याप्रकरणी पुढील तपास पोलीस निरिक्षक राकेश मानगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस नाईक संतोष सुर्यवंशी करीत आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.