जळगावात घरफोडी, ४ लाखांचा ऐवज लंपास

0

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क

जळगाव शहरातील अशोक नगरमध्ये बंद घर फोडून ३ लाख ९७ हजार रूपये किंमतीचे सोन्या-चांदीचे दागिने आणि रोकड लंपास केल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी मंगळवारी ३ जानेवारी रोजी एमआयडीसी पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सनी विकास सोनार (वय ३२, रा. अशोक नगर, अयोध्या नगर परिसर, जळगाव) हे आपल्या परिवारासह राहतात. खाजगी नोकरी करून आपला उदरनिर्वाह करतात. सोमवारी २ जानेवारी रोजी सायंकाळी ६ ते ८ वाजेच्या दरम्यान त्याचे घर बंद असताना अज्ञात चोरट्याने बंद घराचे कुलूप तोडून घरात प्रवेश केला. लाकडी कपाटातून ३ लाख ९७ हजार रूपये किंमतीचे सोन्या-चांदीचे दागिने व रोकड असा मुद्देमाल लंपास केल्याचे उघडकीस आले आहे.

याप्रकरणी सनी सोनार यांनी दिलेल्या तक्रारीवरून मंगळवारी ३ जानेवारी रोजी एमआयडीसी पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक निलेश गोसावी करीत आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.