कॅम्प योजनेअंतर्गत मजुरीमध्ये मोठा अपहार- मनसे

0

 यावल, लोकशाही न्यूज नेटवर्क 

वनपरिक्षेत्र अधिकारी चोपडा प्रादेशिक यांनी कॅम्प योजनेमध्ये १ ते २८ मजुरांच्या मजुरीमध्ये अपहार केल्याची तक्रार मनसे जिल्हा अध्यक्ष जनहीत विभाग चेतन अढळकर यांनी सहाय्यक वनरक्षक चोपडा प्रादेशिक यांच्याकडे निवेदना द्वारे केली आहे.

निवेदनात म्हटले आहे की, वन परिक्षेत्र अधिकारी चोपडा प्रादेशिक यांनी केंद्र शासनाच्या महत्वकांक्षी योजना कॅम्पमध्ये मार्च २०२० मध्ये मजुरांच्या मजुरीमधे मोठ्या प्रमाणात अपहार करून मोठा भ्रष्टाचार केला आहे. तसेच शासन नियमानुसार मजुरांचे देयक हे त्यांच्या बँक खात्यावर वर्ग करणे अपेक्षित आहे. तरी असे झाले नसुन याच्या उलट शासनाच्या तिजोरीवर मोठा डल्ला मारला आहे.

वन परिक्षेत्र अधिकारी यांनी त्यांच्या मर्जीनुसार जे मजुर नाही त्यांना मजुर दाखवून त्यांचे बँक पुस्तकआणि अंकाउट नंबर घेऊन त्यांच्या खात्यावर लाखो रुपये टाकून शासनाची फसवणूक केली आहे.  योजनेमध्ये लाखोंचा भ्रष्ट्राचार केला आहे. तसेच अशा बोगस लाभार्थीची यांची निवेदनामध्ये जोडलेली आहे. यामुळे अशा भष्ट्राचारी अधिकाऱ्यांवर वरिष्ठ पातळीवर लवकरच चौकशी करून घेतलेले पैसे शासनाने परत घ्यावे.  ही अत्यंत गंभीर बाब असल्यामुळे अशा भ्रष्ट अधिकाऱ्यांवर बडतर्फची कारवाई करावी अशी मागणी चेतन अढळकर यांनी निवेदनाद्वारे केली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.