मनवेल येथे संयुक्त कुष्ठरोग व क्षयरोग शोध मोहीम सुरु

0

मनवेल ता.यावल, लोकशाही न्युज नेटवर्क 

केंद्र सरकारच्या आदेशानुसार  १३ सप्टेंबर ते ३० सप्टेंबर २०२२ या सप्ताहात संयुक्त कुष्ठरोग व क्षयरोग शोध मोहिमेला मनवेल येथे सुरुवात करण्यात आली. आशा स्वंयसेविका व एक स्वंयसेवक प्रत्येक घरोघरी  जाऊन घरातील सर्व सदस्यांची तपासणी करीत आहे.

संशयित रुग्ण आढळल्यास त्याचे नाव गुप्त ठेवण्यात येणार आहे. अशा रुग्णावर प्राथमिक आरोग्य केंद्र व ग्रामीण रुग्णालय यावल येथे मोफत उपचार करण्यात येणार आहे. संयुक्त कुष्ठरोग व क्षयरोग शोध मोहिमेकरीता शहरी भागात १० तर ग्रामीण भागात २११ जणांची टिम तयार करण्यात आली आहे, अशी माहिती तालुका पर्यवेक्षक नरेंद्र तायडे यांनी दिली.

संयुक्त कुष्ठरोग व क्षयरोग शोध मोहीम ग्रामीण भागात आशा स्वंयसेविका व स्वंयसेवक घरोघर जाऊन सर्वेक्षणाला सुरुवात करण्यात आली आहे. यात सर्व सदस्यांना कुष्ठरोग व क्षयरोग या आजारावर माहिती देऊन तपासणी करीत आहे. फिकट लालसर न खाजणारा ना दुखणारा, बधीर चट्ट्यांची तपासणी करण्यात येत आहे.

साकळी प्राथमिक आरोग्य केद्रांतील डॉ. स्वाती कवडीवाले, समुदाय आरोग्य अधिकारी डॉ. अस्मा प्रविण नमुद्दीन शेख यांचा मार्गदर्शनाखाली आरोग्य सर्वेक्षणाला सुरुवात झाली आहे.

मनवेल येथे संयुक्त कुष्ठरोग व क्षयरोग सर्वेक्षणाला सुरुवात करण्यात आले आहे. यात आशा स्वंयसेविका रंजना कोळी, पुनम पाटील, स्वंयसेवक गोकुळ कोळी, दिपक पाटील, सुपरवायझर अरुण चौधरी, गटप्रवर्तक चित्रा जावळे, लीना पाटील, आरोग्य सेवक राजेश्वर निकुंभ आदी परीश्रम घेत आहे.

कुष्ठरोग व क्षयरोग विषयी समज व गैरसमज बाजूला सारुन संशयित रुग्णांनी तात्काळ निदान व लवकर उपचार केल्यास  रोगप्रसाराला आळा बसु शकेल. तालुक्यात अशा रोगाला हद्दपार करण्यासाठी व निरोगी जीवन जगण्यासाठी सुरु असलेल्या संयुक्त कुष्ठरोगी व क्षयरोग शोध मोहिमला सहकार्य करावे असे आवाहन तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ.गफुर तडवी यांनी केले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.