शिर्डी विश्वस्त मंडळ बरखास्त; महाविकास आघाडीला दणका

0

शिर्डी, लोकशाही न्यूज नेटवर्क 

औरंगाबाद कोर्टाने( Aurangabad Court) महाविकास आघाडी सरकारला (Maha Vikas Aghadi Govt) दणका दिलाय. शिर्डीचे विश्वस्त मंडळ बरखास्त करण्यात आले आहे. साईमंदिराचे (Shirdi Sai Temple) राजकीय विश्वस्त मंडळ बरखास्त करण्याचे आदेश औरंगाबाद हायकोर्टाने दिले आहे. आता 8 आठवड्यांमध्ये नवे विश्वस्त मंडळ स्थापन करावे लागणार आहे. नविन विश्वस्त मंडळाची नेमणूक होईपर्यंत जिल्हा न्यायाधीश साईमंदिराचा कारभार पाहणार आहे.

शिर्डीतील सामाजिक कार्यकर्ते उत्तम शेळके यांनी शिर्डीतील राजकीय विश्वस्त मंडळ बरखास्त करण्याच्या मागणीसाठी याचिका दाखल केली होती. या याचिकेवर मुंबई हायकोर्टाच्या औरंगाबाद खंडपीठाने महत्त्वाचा निर्णय दिला.

आघाडी सरकारने साई संस्थानमध्ये विश्वस्त मंडळ स्थापन केले होते. विश्वस्तपदांसह अध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेसचा, उपाध्यक्ष शिवसेनेचा आणि विश्वस्त काँग्रेसचे वाटप असे झाले होते. आघाडी सरकारने 16 सदस्यांची केली नेमणूक केली होती. मात्र साईसंस्थानच्या घटनेनुसार या मंडळाची नेमणूक झाली नसल्याचा आक्षेप घेण्यात आला होता.

 

Leave A Reply

Your email address will not be published.