यावल तालुक्यातील १७ वर्षीय मुलीस फूस लावून पळविले

0

यावल : तालुक्यातील एका गावातील १७ वर्षीय अल्पवयीन मुलीचे अज्ञात व्यक्तीने आमीष दाखवत अपहरण केले. हा प्रकार २७ मार्चला रात्री ८ वाजेला उघडकीस आला. याप्रकरणी यावल पोलीस ठाण्यात गुरुवारी अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

यावल तालुक्यातील एका गावात १७ वर्षीय अल्पवयीन मुलगी आपल्या परिवारासह राहत होती. दरम्यान, ही मुलगी घरी असताना अज्ञात व्यक्तीने तिला आमिष दाखवत पळवून नेत तिचे अपहरण केले. या प्रकरणी पीडित अल्पवयीन मुलीच्या वडिलांनी दिलेल्या फिर्यादीवरून अज्ञात व्यक्तीविरुद्ध यावल पोलीस ठाण्यात अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास पोलीस निरीक्षक प्रदीप ठाकूर यांच्या मार्गदर्शनात सहायक पोलीस निरीक्षक हरीश भोये करत आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.