अनैतिक संबंधातून महिलेचा दगडाने ठेचून निर्घृण खून

0

मुक्ताईनगर, लोकशाही न्युज नेटवर्क 

 

मुक्ताईनगर येथील महालखेडा शिवारातून धक्कादायक घटना समोर आली आहे. अनैतिक संबंधातून महिलेच्या डोक्यात दगड टाकून, शरिरावर गळ्यावर धारदार हत्याराने वार करून निघृण खून करण्यात आल्याची खळबळजनक घटना शुक्रवारी घडली.

मिळालेल्या माहितीनुसार, मालताबाई मनोज खुळे (वय 35) ही महिला स्वतः च्या शेतात काम करण्यासाठी गेली होती. सदर महिला ही दररोज पाच वाजता घरी यायची. परंतु साडेपाच वाजले तरीसुद्धा महिला घरी न आल्याने घरातील मंडळी शोधण्यासाठी निघाले.

दरम्यान 5 एप्रिल शुक्रवारी रोजी संध्याकाळी 6.15 वाजेच्या पुर्वी महालखेडा शिवारातील डाबर नाल्याजवळ महिलेचा मृतदेह आढळून आला होता. पोलीस तपासात महिलेची ओळख पटली. त्यानंतर मयत महिलेच्या अल्पवयीन मुलाच्या फिर्यादीवरून संजय सुधाकर पाटील (रा. महालखेडा ता. मुक्ताईनगर) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

संजय पाटीलचे मयत महिलेसोबत अनैतिक संबंध होते. मयत महिलेसोबत याच मुद्द्यावरून तो वाद सुध्दा करत असायचा. याच वादातून शुक्रवारी त्याने डोक्यात दगड टाकुन, शरिरावर गळ्यावर धारदार हत्याराने वार करुन संबंधित महिलेचा खून केला.

याप्रकरणी मुक्ताईनगर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस निरीक्षक नागेश मोहिते यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस करीत आहेत.

 

Leave A Reply

Your email address will not be published.