फसवणूक केल्याप्रकरणी एकाला तीन वर्ष 11 महिने साध्या कारावासाची शिक्षा

0

यावल :- फैजपूर येथील प्रांताधिकारी कार्यालयात अंजाळे येथील एकाने एका प्रकरणात खोटे भाऊ बहिण उभे केले होते व शासनाची तब्बल 13 लाखात फसवणूक केली होती. ही घटना 2019 मध्ये घडली होती व या प्रकरणी फैजपूर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्यात यावल न्यायालयात व्यक्तीविरुद्ध आरोप सिध्द झाल्याने त्याला तीन वर्ष 11 महिने साध्या कारावासाची शिक्षा ठोठावण्यात आली.

अंजाळे, ता.यावल येथील त्र्यंबक रामचंद्र सपकाळे यांनी 2019 मध्ये फैजपूर येथील प्रांताधिकारी कार्यालयात एका प्रकरणात खोटे बहिण व भाऊ उभे करून शासनाची सुमारे 13 लाखात फसवणूक केली. याबाबत उपविभागीय अधिकारी फैजपूर यांनी आरोपीविरुद्ध फैजपूर पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल होऊन गुन्हा दाखल करण्यात आला .

यावल न्यायालयात या गुन्ह्याचा खटला चालला. यात सरकारी वकील निलेश लोखंडे यांनी एकूण 17 साक्षीदार तपासले व आरोपीविरोधात गुन्हा सिध्द झाला. या खटल्यात यावल न्यायालयाचे सह दिवाणी न्या.व्ही.एस.डामरे यांनी आरोपीस तीन वर्ष 11 महिने साध्या कारावासाची शिक्षा सुनावली. आरोपी हा 2020 पासून तुरूंगात असल्याने उर्वरीत दिवस शिक्षेतून वगळण्यात येणार आहेत. खटल्याचे कामकाज सरकारी अभियोक्ता म्हणून निलेश लोखंडे यांनी पाहिले. पैरवी अधिकारी महिला पोलीस कर्मचारी सुशीला भिलाला यांनी पाहिले.

 

 

Leave A Reply

Your email address will not be published.