यावल येथे काँग्रेसचे स्टेट बँकेसमोर आंदोलन

0

यावल , लोकशाही न्यूज नेटवर्क

येथील अखिल भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या वतीने केन्द्र शासनाच्या गौतम अदानी यांच्या उद्योग समुहातील गोंधळलेल्या अर्थकारणाच्या विरोधात आज शहरातील स्टेट बँके समोर आंदोलन करण्यात आले यावेळी केन्द्र शासनाच्या विरोधात घोषणा देण्यात आल्या .

महाराष्ट्र प्रदेश कॉग्रेस कमिटी च्या सुचनेनुसार जळगाव जिल्हा कॉग्रेस कमिटीच्या नेतृत्वाखाली यावल तालुका व शहर कॉग्रेस कमिटी तर्फे बुधवार दिनांक ८फेब्रुवारी रोजी स्टेट बँक ऑफ इंडियाच्या मुख्य शाखा सातोद रोड, यावल येथे सकाळी ११ वाजता गौतम अदानी यांच्या उद्योग समुहातील गैर कारभाराची केद्रातील नरेन्द्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकारने तातडीने चौकशी करावी यामागणी साठी तालुका व शहर कॉग्रेस कमिटीतर्फ आंदोलन करण्यात आले व स्टेट बँकेचे व्यवस्थापक विजय पी टाले यांना या संदर्भातील निवेदन देण्यात आले . या केन्द्र शासनाच्या दिशाहीन कारभाराच्या विरोधात यावलच्या स्टेट बँकेच्या शाखेसमोर निर्दशने करण्यात आली. या आंदोलनाचे नेतृत्व कॉंग्रेस कमेटीचे तालुका अध्यक्ष प्रभाकर अप्पा सोनवणे,यावल पंचायत समितीचे गटनेते शेखर पाटील , नगरसेवक शेख असलम शेख नबी, नगरसेवक समिर मोमीन , नगरसेवक मनोहर सोनवणे, शहर कॉग्रेसचे अध्यक्ष कदीर खान , उपाध्यक्ष अनिल जंजाळे , कोरपावलीचे माजी सरपंच जलील पटेल ,अमर कोळी यांच्या पदाधिकारी, महिला कॉग्रेस पदाधिकारी चंद्रकलाताई इंगळे, आदीवासी विभागाचे बशीर तडवी , नईम शेख , राहुल गजरे ,युवक काँग्रेस पदाधिकारी, एस.सी.विभाग पदाधिकारी, पक्षाच्या अल्पसंख्याक पदाधिकारी सेवादलचे पदाधिकारी इत्यादी सर्व कार्यकर्ते यांनी प्रामुख्याने या आंदोलनात सहभागी झाले.

Leave A Reply

Your email address will not be published.