जळगाव शहरात रमाबाई आंबेडकर जयंती साजरी

0

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क

दि. ७ जानेवारी रोजी रमाबाई आंबेडकर यांची जयंती होती. त्यांच्या जयंतीनिम्मित शहरात विविध ठिकाणी कार्यक्रम आयोजन करण्यात आले होते. दरम्यान विविध क्षेत्रातील मान्यवरांनी त्यांना अभिवादन केले. रमाबाई आंबेडकर यांचा जन्म 7 फेब्रुवारी 1898 रोजी एका निम्नवर्गीय दलित कुटुंबात झाला. पुढे त्यांचा विवाह डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याशी झाला. त्यांना रमाई किंवा आई रमा म्हणून ओळखले जाते.

फाटके लुगडे जोडून, अर्धपोटी राहून, अपार कष्ट सोसून बाबासाहेबांना शिक्षण घेण्यास आणि सामाजिक कार्यात मदत करणारी रमाई आपली ऊर्जा व्हावी, असे महात्मा ज्योतिबा फुले केळी संशोधन केंद्राच्या सहाय्यक प्राध्यापिका अंजली मेंढे यांनी पौर्णिमा वुमेन्स फाऊंडेशनच्या वतीने रमाबाई आंबेडकर जयंती निमित्त डॉ.बाबासाहेब साहेब आणि माता रमाई यांना अभिवादन करण्यात आले. यावेळी अध्यक्षा गौतमी वाघमारे यांनी रमाबाईंच्या पुढील जयंती पर्यंत किमान १०० कामकरी महिलांना साड्या वाटण्याचा संकल्प फाऊंडेशनच्या वतीने जाहिर केला. यावेळी सचिव सुषमा कांबळे, किरण वनकर रूपस्थित होत्या.उषा बेहरे यांनी रमाई याच्यावरील गीत गायले. कार्यक्रमास पौर्णिमा वुमेन्स फाऊंडेशन च्या कार्यकारणी आणि सहकार्यकारिणीच्या भगिनी फाऊंडेशन च्या गणवेशात ऊपस्थित होत्या.

Leave A Reply

Your email address will not be published.