नवी दिल्ली ;- लोकसभा निवडणुकासाठी भाजपने उमेदवारांची सहावी यादी जाहीर केली आहे, या यादीत राजस्थान आणि मणिपूरमधील उमेदवारांची नावे आहेत. राजस्थान येथील करौली-धोलपूरमधून इंदू देवी जाटव यांना उमेदवारी दिली आहे, तर कन्हैया लाल मीना यांना दौसामधून उमेदवारी दिली आहे.
मणिपूरमधून भाजपाने थौनओजम बसंत कुमार सिंह यांना उमेदवारी दिली आहे. भाजपच्या या सहाव्या यादीत महाराष्टातील एकाही उमेदवाराचा समावेश नाही.