पर्यावरणदिनाच्या पूर्वसंध्येला आयोजीत चित्रकला स्पर्धेला विद्यार्थ्यांचा उदंड प्रतिसाद

0

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क

पर्यावरण दिनाच्या पूर्व संध्येला महिला पर्यावरण सखी मंच व जायंटस ग्रूप ऑफ तेजस्विनी जळगाव यांच्या संयुक्तं विद्यमाने 5 जून जागतिक पर्यावरण दिनानिमित्त बालचित्रकला स्पर्धा 2022 चे आयोजन ४ जून रोजी महात्मा गांधी उद्यान, नवीन बस स्टँड जवळ येथे करण्यात आले. ही स्पर्धा फक्त जळगाव शहरातील विदयार्थी विद्यार्थिनी (मुलामुलींसाठी) आयोजीत करण्यात आली असून यात ४०० विद्यार्थ्यांनी इयत्ता पहिली ते नववी पर्यंत तीन गटांमधून सहभाग घेतला.

याप्रसंगी स्पर्धेचे उद्घाटन प्रमुख अतिथी महापौर जयश्री महाजन यांच्या शुभ हस्ते वटवृक्षाचे पुजन करून करण्यात आले. चित्रकार राजेंद्र सूर्यवंशी व चित्रकार सुनील दाभाडे हे परीक्षक प्रमुख अतिथी तसेच महिला पर्यावरण सखी मंच राज्य उपाध्यक्ष मनिषा पाटील उपस्थित होते. स्पर्धेसाठी विद्यार्थ्यांचा उदंड प्रतिसाद लाभला.

पर्यावरण सखी मंचच्या पुढील आयोजित कार्यक्रमात मान्यवरांच्या हस्ते बक्षीस वितरण करण्यात येईल. स्पर्धेसाठी ज्योती राणे, किमया पाटील, छाया पाटील, नेहा जगताप, मनिषा शिरसाठ, नुतन तासखेडकर, योगिता बाविस्कर, रेणुका हिंगु, माधुरी शिंपी, अर्चना महाजन, रुद्राणी देवरे, कविता पाटील, पुनम पाटील , शशी शर्मा, वैशाली बाविस्कर,  आशा मौर्य, सिमा वाघ यांचे विशेष सहकार्य लाभले. याप्रसंगी महिला पदाधिकारी व सदस्या उपस्थित होत्या. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन छाया अजय पाटील यांनी केले व आभार नेहा जगताप यांनी मानले.

Leave A Reply

Your email address will not be published.