माहेरहून पैसे आणण्याची मागणी करत विवाहितेला ठेवले उपाशी

0

भडगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क                                

घर बांधण्यासाठी माहेरहून 10 लाख रुपये दिले नाही म्हणून महिलेला वेळोवेळी मारहाण शिवीगाळ करून मानसिक त्रास दिला म्हणून पती, सासू, जेठ, जेठानी यांच्यावर भडगाव पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

कविता राजेश पाटील (वय 37, रा. लक्ष्मी नगर इंदोर हल्ली मुक्काम भडगाव) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून दि १५/४/१९८६ ते १४५/४/२०२२ या तारखेपर्यंत पती राजेश भालेराव पाटील, सुमनबाई भालेराव पाटील, जेठ प्रकाश भालेराव पाटील, जेठानी सुनीता प्रकाश पाटील, सर्व राहणार लक्ष्मी नगर इंदोर मध्य प्रदेश यांनी संगनमत करून पीडित महिलेस घर बांधण्यासाठी माहेरहून १० लाख रुपये असे सांगितले ते दिले नाही म्हणून पीडितेस मारहाण शिवीगाळ करून उपाशी पोटी ठेऊन शारीरिक व मानसिक त्रास दिला.

म्हणून पती, सासू, जेठ, जेठानी यांच्या विरुद्ध भडगाव पोलिसात महिलेच्या फिर्यादी वरून गुरंन १२८/२०२२ भादवी कलम ४९८ अ ३२३ , ५०४, ५०६, ३४ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घटनेचा तपास म. पो. हे. कॉं. पंचशीला निकम हे करीत आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.