लोकशाही न्यूज नेटवर्क
पिंपळगाव – येथील बेबाबाई तडवी यांच्या घरातून 3 मोबाईल अज्ञात चोरट्यांनी दि. 7 ते 10 जाने दरम्यान चोरून नेले होते त्याबाबत पिंपळगाव पोलिस स्टेशन येथे दि. 11 रोजी गुन्हा दाखल करण्यात आला होता सदर गुन्ह्यात आरोपी रोषणबाई तडवी हिस अटक करण्यात आली असून सदर गुन्ह्यातील तीचेकडून चोरी गेलेले 3 मोबाईल हस्तगत करण्यात आले आहे.
सदरची कारवाई पोलिस अधिक्षक एम राजकुमार , मा.अपर पोलिस अधीक्षक रमेश चोपडे , मा. उपविभागीय पोलिस अधिकारी भारत काकडे यांच्या मार्गदर्शनाखाली पिंपळगाव पोलिस स्टेशनचे प्रभारी अधिकारी सहाय्यक पोलिस निरीक्षक महेंद्र वाघमारे, पोलिस उपनिरीक्षक अमोल पवार, पोलिस हवालदार रणजित पाटील, पोलिस कॉन्स्टेबल अमोल पाटील, पोलिस नाईक पांडुरंग गोरबंजारा, पोलिस नाईक शिवनारायण देशमुख, पोलिस कॉन्स्टेबल पंकज सोनावणे, पोलिस कॉन्स्टेबल अभिजित निकम यांनी केली आहे.


