लोकशाही न्यूज नेटवर्क
यावल – सातपुडा पर्वताच्या अतिदुर्गम क्षेत्रातील गावात राहणाऱ्या बेपत्ता झालेल्या विवाहित महिला करसना सुभाष बारेला वय 30 राहणार गाड्या ता. यावल याचा जंगलात मृतदेह आढळल्याने खळबळ उडाली आहे
सविस्तर वृत्त असे की करसना बारेला ह्या आपल्या परिवारासह गाड्या येथे वास्तव्यास असून त्या ९ जानेवारी पासून त्यांच्या राहत्या घरातून बेपत्ता झाल्या होत्या याबाबत यावलपोलीस स्टेशन मध्ये 12 जानेवारी रोजी नोंद करण्यात आली होती यादरम्यान महिलेचा मृतदेह गाड्या जंगलात आढळून आल्याने खळबळ उडाली असून पोलिसांनी घातपात असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे
या घटनेची खबर गाडया येथील पोलीस पाटील केरसिंग घाटू बरेला यांनी खबर दिल्या मुळे यावल पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली पुढील तपास पोलीस निरीक्षक राकेश माणगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक प्रदीप बोरुडे हे तपास करीत असुन दुर्गम भागात गाड्या येथे घटनास्थळी पोलीस उपनिरीक्षक प्रदीप बोरुडे यांच्यासह पोलीस नाईक युनूस तडवी महिला पोलीस कर्मचारी ज्योती खराटे व गणेश ढाकणे व यावल ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ. शिवदास चव्हाण कर्मचारी बापू महाजन यांचे पथक रवाना झाले


