व्हाट्स अँप वरील गृप.. आणि आपण

0

लोकशाही विशेष लेख

 

माझ्याएका जवळच्या मैत्रिणीने तिचे दोन्ही मोबाईल फोन कायमचे बंद केले? आजच्या युगात मोबाईल किती गरजेचा आहे, हे माहित असूनही; आणि ती स्वतः वर्किंग असूनही तिने केलेले हे धाडस खरच कौतुकास्पद असे होते.. मी तिला “का केलं?” असं विचारताच तिने खाजगीत दिलेलं उत्तर अगदी मार्मिक पण शंभर टक्के मला पटलं…! ती खरंच खूप वैतागून सांगत होती..

“जो तो उठसूट आपला एक व्हाट्सएप गृप (Whatsapp group) तयार करतो आणि त्यात जबरदस्ती कुणालाही न विचारता फ्री एड करून घेतो!! अशा ग्रुप्सवर ज्यांना काही येतं ते ते तर लिहितातच, पण ज्यांना साधी वाह वाह.. सुद्धा नाही करता येत ते चक्क ढापलेली कविता सेंड करून साहित्यिक असलेल्याची छाप टाकत असतात… कंटाळून सारे ग्रुप्स सोडले आणि आज मस्त फोन वजा जीवन जगतेय. !!”

अगदी मस्त रिलॅक्स होऊन ती मला सांगत होती. खरंच हा ग्रुपचा आजार उभ्या राज्यभर पसरला आहे. त्यांत किती काळ रमायचे हे ज्याचं त्यानें ठरवायचंय. शंभरातले शंभर कवी असतील तर मग कविता ऐकायची कोणी? एकदा मी एक पोस्ट वाचून त्यावर आपली प्रतिक्रिया ‘लेख आवडला’ अशी मी देताच तिकडून कवी महाशय बऱ्या पैकी रागावले, आणि म्हणाले

“तो लेख नसून माझी कविता आहे…गद्य रुपातले पद्य” !!!!!

मी दचकलीच! त्या नंतर मला न सांगताच माझा नंबर स्वतःच्या गृप मधून कायमस्वरूपी डिलीट केला. कवितेशिवाय काय बी नाय…!! असा आदेश देऊन मला कटऑफ केला. माझा जीव वटावला. पण मला गद्यातली पद्य नाही जमत म्हणून मी तो महान गृप सोडल्याचे समाधान वाटले.
या आफती नंतर मला एक युक्ती सुचली… एक-एक करून EGO वाले सर्व ग्रुप मधून मी स्वतःला आउट करून घेतलं. असे मी चक्क 45 गृप सोडले.
केवळ अश्या गृपमध्ये आता राहतेय ज्या मध्ये कसलीच ओढाताण नाही. कविता, लेख, मिनी कथा, चुटकुले, अनुभव कथन, विनोद आणि बरंच कांही शेर करता येते. इतरांनी शेर केलेलं वाचता येतं…

बरं हे फक्त कवितेच्याच बाबतीत होतं, असं नाही.. तर कोणी पार्लरवाली गृप तयार करते, कोणी सुगरण सखीचा करते, कोणी सामाजिक कामाचा करते..! गृप तयार करण्यास काही दुमत नाही, मात्र कधी तर फक्त अडमीनच पोस्ट टाकेल अशीही सक्ती दिसून येते…

तात्पर्य काय; तर ‘स्वतः करतो ते सत्य, इतरांना तंबी.’ म्हणजे
“अपने को न्हाय हशीयत और दुसरों को नशीयत.”

खरं तर या गृप मुळे क्षणिक का होईना, थोडं मनोरंजन जरूर होते. मित्रांचे विचार कळतात. काहीसे प्रबोधन हि होते…काळजी तेव्हडी घ्यावी लागते इतकंच.. अन्यथा सर्वत्र बिन बादल बरसात असा तथाकथित पोस्टचा, किंवा इतर साहित्याचा नको असलेला पाऊस बरसणार एव्हढं खरं… तर आपण
काळजी घेऊ या ! नाहीतर व्हाट्स ऍपच्या या पोस्टचा आजार असह्य असतो म्हणे…!
बाकी कुछ नही… एन्जॉय करो

वैशाली पाटील
९४२०३५०१७१
जळगाव

Leave A Reply

Your email address will not be published.