स्काॅच एग्ज

0

लोकशाही विशेष लेख

 

आपली भेट ही दर मंगळवारी होत असते, त्यामुळे आतापर्यंत आपण सतत शाकाहारी मेजवानी पाहिल्या आहेत, पण आजची मेजवानी ही मांसाहार करणाऱ्यांसाठी आहे. चला तर मग लागा तयारीला.. आज आपण बनवणार आहोत स्काॅच एग्ज (Scotch eggs)…

स्काॅच एग्ज

साहित्य:

५ अंडी, चिकन खिमा पाव किलो, २ कांदे, १ चमचा आलं – १ चमचा लसूण, २/३ हिरवी मिरची (बारीक चिरून), १ चमचा मिक्स हर्ब, १/२ चमचा ब्लॅक पेपर पावडर, १/२ चमचा मस्टर मेयॉनीज, २ चमचे मैदा, १ वाटी ब्रेड क्रम्स, पार्स्ले/ कोथिंबीर, मीठ, तळण्यासाठी तेल

कृती :

१) प्रथम ४ अंडी उकळून घ्यावी.
२) चिकन खिमा घेऊन त्यामध्ये कांदे, आलं, लसूण, हिरवी मिरची, मिक्स हर्ब, ब्लॅक पेपर पावडर, मस्टर मेयॉनीज, पार्स्ले किंवा कोथिंबीर, व मीठ घालून एकजीव करून घ्यावे.
३) उकळलेली अंडी थंड झाल्यावर कवच काढून थंड करून घ्यावीत.
४) १ अंडे फेटून घ्यावे.
५) १ उकळलेले अंडे मैद्यामध्ये घोळवून घ्यावे. (मैद्यामध्ये थोडं मीठ व ब्लॅक पेपर पावडर मिसळून घ्यावी)
६) मैद्यामध्ये घोळवलेले अंडे फेटलेल्या अंड्यामध्ये घोळवून परत एकदा मैद्यामध्ये घोळवून घ्या.
७) आता हाताला थोडं तेल लावून चिकन खिमाची एक गोळी घ्यावी व ती लाटून घ्यावी. किंवा हातावर थापून घ्यावी.
८) लाटलेल्या चिकन खिमामध्ये अंडे मधोमध ठेवून त्याचा अंड्याच्या आकाराच्या शेपमध्ये गोळा करून घ्यावे.
९) हे स्काॅच एग्ज फेेटलेल्या अंड्यामध्ये बुडवून, ब्रेड क्रम्समध्ये घोळवून घ्यावे.
१०) तयार केलेले स्काॅच एग्ज लालसर रंगावर तळून घ्यावे. व खाण्यासाठी एखाद्या डिपसोबत द्यावे.

 

अपर्णा स्वप्निल कांबळे/नांगरे
९८९२१३८१३२
पत्रकार/फूड ब्लॉगर

Leave A Reply

Your email address will not be published.