अरे वाह…व्हॉट्सअ‍ॅपवर व्हिडिओ कॉल सुरू असतानाही करता येणार ‘हे’ काम

व्हॉट्सअ‍ॅपच 'हे' नवीन फिचर फारच लाभदायक

0

लोकशाही न्यूज नेटवर्क

कोरोना नंतर बऱ्याच कंपन्यांनी वर्क-फ्रोम होम सुरु केलं होत. यानंतर आताही कंपन्या ऑनलाईन मिटींग्स अरेंज करतात. या मिटींग्स बऱ्याच वेळा व्हॉट्सअ‍ॅपवर देखील होतात. बऱ्याचवेळा या मिटींग्स अत्यंत कंटाळवाण्या असतात. मात्र, कॉल सुरु असल्यामुळे आपण दुसरं काहीही करू शकत नाही. यावर आता व्हॉट्सअ‍ॅपने एक खास उपाय शोधला आहे.

लवकरच कंपनी असं फीचर लाँच करणार आहे, ज्यामुळे व्हिडिओ कॉल सुरू असतानाही तुम्ही गाणी ऐकू शकणार आहात. WaBetaInfo या वेबसाईटने याबाबतची माहिती दिली आहे. हे फिचर सध्या डेव्हलपिंग फेजमध्ये आहे. अद्याप बीट टेस्टरसाठी उपलब्ध झालेलं नाही. मात्र, यावर वेगात काम सुरु असल्याचं रिपोर्टमध्ये सांगण्यात आले आहे.

ऐकचवेळी ऐकता येणार गाणं
विशेष म्हणजे, व्हिडिओ कॉल सुरु असतांना जे युजरने स्क्रिन शेअर केली, तरीदेखील गाणं सुरु राहणार आहे. यासाठी व्हिडिओ कॉल सुरु झाल्यानंतर स्क्रिनवर खालच्या बाजूला यासाठी ऑप्शन मिळेल. एवढच नाही, तर कॅल्ल्वर असणाऱ्या दोन्ही किंवा सर्व व्यक्तींना हे म्युझिक ऐकू जाईल असा पर्याय याठिकाणी देण्यात आला आहे. म्हणजेच, दोन मित्र व्हिडिओ कॉलवर एकत्र एक गाणं ऐकू शकणार आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.