वाघूर पाणीपुरवठा योजनेच्या कार्यारंभाचे मंत्री गुलाबराव पाटलांचे आदेश…

0

 

पाचोरा, लोकशाही न्यूज नेटवर्क:

जिल्ह्याचे पालकमंत्र तथा राज्याचे पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील (District Guardian and State Water Supply and Sanitation Minister Gulabrao Patil) यांच्या आदेशान्वये वाघूर धरणावरून लोहाऱ्यासाठी जल जीवन मिशन (Jal Jeevan Mission) योजने अंतर्गत पाणी पुरवठा योजनेला कार्यारंभाचे आदेश मिळाल्याची माहिती लोहाऱ्याचे सरपंच अक्षयकुमार जयस्वाल यांनी दि.३१ ऑक्टोबर रोजी सकाळी उपस्थित पत्रकारांना दिली व सदर योजना पूर्ण झाल्यावर गावाचा पुढील पन्नास वर्षांचा पाणी प्रश्न संपुष्टात येईल असे सांगितले.

लोहारे गावाची प्रमुख पाणी पुरवठा योजना राणीचे बांबरुड येथून असून म्हसास धारणा वर पूरक पाणी पुरवठा योजना आहे, या दोन्ही धरणांच्या क्षेत्रात कमी प्रमाणात पाऊस पडल्यास धरणं भरत नाहीत व त्याचा गावातील पाणी पुरवठ्यावर विपरीत परिणाम होत असे भविष्यात गावाची वाढती लोकसंख्या लक्षात घेता गावातील नेते त्यांच्या त्यांच्या परीने त्यांच्या पक्ष श्रेष्टींकडे वाघूरची पाणी पुरवठा योजना मिळावी अशी मागणी करत आले व त्याला यशही आले.

तत्पूर्वी कार्यारंभाची बातमी कळताच लोकांमध्ये उत्सवाचे वातावरण दिसून आले. त्यानंतर सरपंच अक्षय जयस्वाल व त्यांच्या सर्व सहकार्यांनी पाणी पुरवठा व स्वच्छता तथा पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या निवासस्थानी जाऊन त्यांची भेट घेत आभार मानले.

Leave A Reply

Your email address will not be published.