जळगावात १ डिसेंबरपासून राज्य वॉलीबॉल अजिंक्यपद स्पर्धा

0

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क 

महाराष्ट्र व्हॉलीबॉल असोसिएशन मुंबई यांच्या मान्यतेने जळगाव जिल्हा पासिंग व्हॉलीबॉल असोसिएशन जळगाव आयोजित ४८ वी  जूनियर राज्य व्हॉलीबॉल अजिंक्यपद स्पर्धा (१८ वर्षाखालील मुले व मुली) नूतन मराठा महाविद्यालयाच्या क्रीडांगणावर दिनांक १ ते ३  डिसेंबर या कालावधी होत असल्याचे पासिंग व्हॉलीबल असोसिएशनचे अध्यक्ष फारुख शेख व सचिव अंजली पाटील यांनी सांगितले.

८ विभागामार्फत राज्याचे प्रतिनिधित्व

महाराष्ट्र राज्यातील मुंबई, नाशिक, पुणे, कोल्हापूर, नागपूर, अमरावती, औरंगाबाद व लातूर अशा आठ विभागाच्या माध्यमाने राज्यातून सुमारे २४० मुलं आणि मुलींचा सहभाग या स्पर्धेत  होणार आहे. या स्पर्धेत सहभागी होणाऱ्या खेळाडूंना १०वी व १२ वी परीक्षेत स्पोर्ट कोटामधे मार्क मिळतील तसेच प्रथम तीन स्थान मिळविणाऱ्या संघातील खेळाडूंना पाच टक्के नोकरीमध्ये सवलत मिळणार आहे.

साखळी व बाद पद्धतीने होणार स्पर्धा

या राज्यस्तरीय स्पर्धा प्रथम पासाखळी पद्धतीने खेळवल्या जातील व त्यानंतर बाद पद्धतीने खेळवल्या जाणार आहे. रात्री लाइटमध्ये सुध्दा या स्पर्धा होतील.

उद्घाटन व बक्षीस समारंभ

१ डिसेंबरला सकाळी स्पर्धाला सुरुवात होईल संध्याकाळी ६ वाजता औपचारिक उद्घाटन होईल. स्पर्धेचे पारितोषिक वितरण समारंभ ३ डिसेंबर रोजी संध्याकाळी ७ वाजता होणार

स्पर्धेसाठी यांचे मिळाले सहकार्य

नूतन मराठा कॉलेज, जैन स्पोर्ट्स अकॅडमी, आमदार राजू मामा भोळे, डॉ. मिलिंद बारी, जळगाव सनशाइन कंपनी जळगाव, सुप्रीम इंडस्ट्रीज जळगाव, केके कॅन्स जळगाव, स्पोर्ट्स हाऊस जळगाव, डॉ. राजेश पाटील, नवजीवन सुपर शॉप, महावीर क्लासेस, भास्कर मसाले, शिवा मेडिको, अजय पाटील अँड कंपनी,हॉटेल तनय, नवरंग चहा, राजू बाविस्कर अँड कंपनी, सेठीया कार्गो, ॲड.सुनील तारे, गितांजली केमिकल.

स्पर्धा यशस्वीतेसाठी विविध समित्या तयार करण्यात आल्या असून त्या माध्यमातून स्पर्धेचे आयोजन करण्यात आलेले आहे. संघटनेचे अध्यक्ष फारुक शेख, कार्याध्यक्ष सुभाष  पवार, उपाध्यक्ष मंजुषा भिडे, खजिनदार विनोद पाटील, सचिव अंजली पाटील, कार्यकारी सदस्य इफ्तेखार शेख, अमोल पाटील, दर्शन आटोळे, प्रसाद पाटील, डॉ. अनिता पाटील व प्रा. डॉ. अनिता कोल्हे, मिलींद काळे हे स्पर्धा यशस्वीतेसाठी प्रयत्नशील आहे.

 

Leave A Reply

Your email address will not be published.