अवकाळी पावसाने जळगाव शहरासह जिल्ह्याला झोडपले

0

जळगाव : गेल्या तीन दिवसांपासून सुरु असलेल्या अवकाळी पावसाने संपुर्ण जिल्ह्याला झोडपून काढले आहे. परंतू गुरुवारी सायंकाळी ढगाळ वातावरण तयार होवून जोरदार वादळी वाऱ्यासह पावसाला सुरुवात झाली. 20 मिनिट झालेल्या या वादळी पावसामुळे जळगावकरांची तारांबळ उडून गेली होती.

तसेच शहरात अनेक ठिकाणी झाडे उन्मळून पडल्याने विद्युत पुरवठा देखील खंडीत झाला होता. तसेच मध्यरात्री दीड वाजेच्या सुमारास अर्धा तास असाच मुसळधार पाऊस पडला. आज पहाटे साडेतीन वाजता सुमारासही पावसाने जोरदार हजेरी लावली. शुक्रवारी सकाळी ढगाळ वातावरण निर्माण होऊन वातावरणात चांगलाच गारठा निर्माण झाला असल्याचे चित्र सर्वत्र दिसून आले.

शहरात गुरुवारी सकाळपासून काही प्रमाणात ढगाळ वातावरण होते. दुपारी मात्र काही कडाक्याचे ऊन पडल्यामुळे अवकाळी पावसाची कोणतीही स्थिती नसल्याने अवकाळीचे संकट टळल्याचे चित्र होते. त्यामुळे दुपारनंतर शहरातील मुख्य बाजारपेठ भागात खरेदीसाठी चांगलीच गर्दी झाली होती. मात्र सायंकाळी ६.१५ वाजता शहरात अचानक वाऱ्याचा वेग वाढला आणि वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाला सुरुवात झाली. अवघ्या 20 मिनिट सुरु असलेल्या पावसामुळे बाजारपेठेतील विक्रेते व इतर नागरिकांची चांगलीच त्रेधाती रिपीट उडाली.

.पावसासोबतच वादळी वाऱ्याचा वेग सुमारे ३५ ते ४०किमी होता यामुळे वाहनधारकांसह पादचाऱ्याला समोरचेही दिसेनासे झाले होते. यामुळे शहरातील अनेक रस्त्यांवर वाहनधारकांनी आपली वाहने थांबवून मिळेल त्याठिकाणी आडोसा घेतला होता.पावसासोबतच वादळी वाऱ्याचा वेग सुमारे ३५ ते ४०किमी होता.

वृक्ष उन्मळून पडली , अनेक भागात बत्ती गुल

वादळी पावसामुळे शहरातील जिल्हा क्रिडा संकुल, सागरपार्क समोरील कोझीकॉटेज पेट्रोल पंपाजवळ, ओंकारेश्वर मंदिराजवळ यासह अनेक भागांमध्ये झाड कोसळल्याच्या घटना घडल्या. तसेच काही भागांमध्ये वीजेचा तारा तुटल्यामुळे अनेक भागांमधील वीज पुरवठा खंडीत झाल्याने शहरातील बहुतांश परिसर रात्री उशिरापर्यंतअं धारात होता.

Leave A Reply

Your email address will not be published.