लोकशाही न्यूज नेटवर्क

लोकप्रिय मोटिवेशनल स्पीकर विवेक बिंद्रा यांच्या विरोधात सेक्टर १२६ मध्ये पत्नीला मारहाण केल्याप्रकरणी गुन्हा दाखल झाला आहे. पीडित महिलेच्या भावाने एफआयआर दाखल केली आहे. विवेक बिंद्रा यांच्याकडून पत्नीला मारहाण झाल्यानंतर अनेक दिवस रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. एवढंच नाही तर, पत्नीच्या कानाचा पडदा देखील फाटला आहे. विवेक बिंद्रा यांच्या विरोधात १४ डिसेंबर रोजी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मात्र शुक्रवारी एफआयआर दाखल केली आहे.
https://twitter.com/kmlpaulkmlx/status/1738302032937951543?ref_src=twsrc%5Etfw%7Ctwcamp%5Etweetembed%7Ctwterm%5E1738302032937951543%7Ctwgr%5Ecf8633c8e6d35d5a924601604f963c7adaef9719%7Ctwcon%5Es1_c10&ref_url=https%3A%2F%2Fzeenews.india.com%2Fmarathi%2Findia%2Fpopular-motivational-speaker-vivek-bindra-accused-of-assaulting-wife%2F769465
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बिंद्राची पत्नी यानिकाचा भाऊ वैभव क्वात्रा यांनी तक्रार दाखल केली. त्याने सांगितले की, ही घटना ते राहत असलेल्या नोएडा येथील सेक्टर 94 मधील सुपरनोव्हा वेस्ट रेसिडेन्सी येथे घडली. ७ डिसेंबरला सकाळी बिंद्रा आणि त्याची आई प्रभा यांच्यात जोरदार वाद झाला. यानिका मध्ये आल्याने बिंद्राने तुच्यावर हल्ला केला. या हल्ल्यामुळे यानिकाला दुखापत झाल्याचे सांगण्यात येत आहे.
विवेक बिंद्राच्या पत्नीसोबत झालेल्या भांडणाचा व्हिडिओ देखील समोर आला आहे. यानिकाला एवढी मारहाण करण्यात आली की, तिच्या कानाचा पडदाही फाटला, असा आरोप आहे. पोलीस सर्व बाबी लक्षात घेऊन या प्रकरणाचा तपास करत आहे.

