नवी दिल्ली, लोकशाही न्यूज नेटवर्क
देशात पुन्हा एकदा कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्याने चिंताजनक स्थिती दिसत आहे. कोरोनाच्या नव्या JN1 सब-व्हेरियंटमुळे जगासह देशातही नवे कोरोना रुग्ण वाढत आहेत. भारतातही कोरोनाच्या नवा सब-व्हेरियंट JN1 चा प्रादुर्भाव वाढून भारतात दिवसेंदिवस कोरोनाचा वाढता आलेख पाहायला मिळत असून कोरोना रुग्णांची संख्या 2900 च्या पुढे गेली असून सहा कोरोना रुग्णांचा मृत्यू झाल्याचीही नोंद झाली आहे. यामुळे प्रशासनाची चिंता वाढली आहे.
नव्या व्हेरियंटचा कहर
चीनसह जगातील अनेक देशांमध्ये कोविडचा JN1 सब-व्हेरियंट वेगाने पसरत आहे. भारतात दर तासाला सुमारे 26 ते 27 कोरोना रुग्ण आढळत आहे, त्यामुळे पुन्हा एकदा भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे. आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, शुक्रवारी, 22 डिसेंबरला 24 तासांत 640 नवीन कोरोना रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. यामुळे देशभरात सक्रिय रुग्णांची संख्या 2,997 वर पोहोचली आहे. तर एका दिवसापूर्वी ही संख्या 2,669 होती.
चिंता वाढवली
कोरोना JN.1 च्या नवीन व्हेरियंटमुळे चिंता वाढली आहे. JN.1 व्हेरियंटमुळे कोविड रुग्णांमध्ये वाढ झाल्याचं मानलं जातं आहे. नवीन JN.1 व्हेरियंट कोविड 19 विषाणूच्या ओमायक्रॉन व्हेरियंटचा सब-व्हेरियंच आहे. JN.1 व्हेरियंटचा पहिला रुग्ण 25 ऑगस्ट 2023 रोजी आढळला होता. केरळमध्ये कोरोनाचा नवीन सब-व्हेरियंट JN.1 चा रुग्ण आढळून आला. दरम्यान, देशाच्या इतर भागांमध्ये अद्याप या व्हेरियंटचा रुग्ण सापडलेला नाही, पण कोरोनाबाधितांची संख्या मात्र वाढली आहे..